निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावतीच्या खेळाडूंची भारतीय आंतर विद्यापीठ संघाकरिता निवड : खेळाडूंमध्ये चार मुले तर सहा मुलींचा समावेश
तलवारबाजी मध्ये खेळाडूंनी पटकाविले गोल्ड मेडल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती येथील खेळाडू ओम पायघन, साहिल जीवतोडे, संकेत दडमल, अमान मसराम, वैभव जगझाप, एकून ४ मुले व नियती कोवे, रोशनी चटारे, डॉली चेट्टी, अनुष्का काळे, भूमिका मेश्राम, साहिबा शेख अश्या ०६ मुली ऐकुन १० खेळाडू भारतीय आंतर विद्यापीठ खेळाकरिता गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर ( पंजाब ) येथे गेलेले आहे. या संघाचे व्यवस्थापक म्हणून प्रा. डॉ. विशाल नि. शिंदे व कोच म्हणून सूरज दखणे व आदित्य सातपुते है काम बघत आहे. नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत तलवारबाजी (मुले/मुली) स्पर्धेत भारतीय आंतर विद्यापीठ संघात निवड झालेली आहे. हे खेळाडू गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली कलर कोट प्राप्त झालेले आहेत.
सदर खेळाडूंना गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे. दि. २ ते १२ नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर (पंजाब) येथे भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत प्रतिनिधित्व करीत आहेत. आपल्या यशाचे श्रेय शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. विशाल शिंदे, व चंद्रपुर जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राकेश तिवारी तसेच प्रा. डॉ. अनिता लोखंडे संचालिका क्रीडा व शारिरीक शिक्षण विभाग गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना दिलेले आहे. व खेळाडूचा महाविद्यालयाच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला असून यावेळी भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे, प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, प्रा. डॉ. अपर्णा धोटे, प्रा. डॉ. नत्थू वाढवे, प्रा. डॉ. दहेगावकर, प्रा. डॉ. नरेंद्र हरणे, प्रा. डॉ. शशिकांत शित्रे, प्रा. संदीप प्रधान, श्री. अजीज शेख, श्री. विशाल गौरकार,श्री. मानकर, श्री.पांडुरंग आखतकर, श्री.प्रमोद तेलंग,श्री. बंडू पेंदोर उपस्थित होते. व पुढील वाटचाली करिता सुभेच्छा देण्यात आल्या.



