ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सभा राष्ट्रभावनेची स्फूर्ती जागवणारी ठरेल _आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

चांदा ब्लास्ट

मा. मोदीजींच्या सभेतून सर्वसमावेशक विकासाची ग्वाही मिळणार

८ नोव्हेंबरला बेतिया येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची विराट सभा

विराट सभेच्या पूर्वतयारीसाठी उच्चस्तरीय नियोजन बैठक बेतिया येथे संपन्न

बेतिया (बिहार)- बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८ नोव्हेंबर रोजी बेतिया येथे देशगौरव पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांची होत असलेली विराट सभा म्हणजे केवळ राजकीय कार्यक्रम नसून सर्वसमावेशक विकासाचा दृढ संदेश देणारी आणि राष्ट्रभावनेची स्फूर्ती जनतेच्या मनामनांत जागवणारी ऐतिहासिक सभा ठरणार असल्याचा ठाम विश्वास महाराष्ट्राचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

बेतिया, बिहार येथे ८ नोव्हेंबर रोजी कुडिया कोटी, चनपटिया प्रखंड येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ देशगौरव पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या विराट जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सभेच्या सर्वांगीण पूर्वतयारीसाठी हॉटेल किसन, बेतिया येथे महत्त्वपूर्ण नियोजन बैठक दिनांक ५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मार्गदर्शन लाभले.

बैठकीत सभास्थळाची सजावट, मंचनिर्माण, प्रशासनिक समन्वय, वाहतूक व पार्किंग व्यवस्था, महिला विभागाचे नियोजन, जनसंपर्क मोहिम, सोशल मीडिया प्रचार, आरोग्य सुविधा, हेलिपॅड व ग्रीनरूम व्यवस्थापन अशा सर्व बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्येक विभागाला स्पष्ट जबाबदाऱ्या देत काम वेळेत आणि काटेकोरपणे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले, “देशगौरव पंतप्रधान मोदीजींचे नेतृत्व म्हणजे विकासाचा वेग, राष्ट्रोन्नतीचा मार्ग आणि भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. आगामी सभा ही केवळ सभा नसून जनतेच्या मनात राष्ट्रभावनेची नवी ऊर्जा जागवणारा क्षण ठरेल. ‘काँग्रेसमुक्त भारत’ हाच आजचा एक संकल्प आहे, असे आ. मुनगंटीवार म्हणाले. त्यांनी काँग्रेसच्या महागठबंधनावर टीका करत त्याला ‘महा-ठगबंधन’ असे संबोधले व कार्यकर्त्यांना जनतेशी व्यापक संवाद साधण्याचे आवाहन केले.

या बैठकीस माननीय खासदार डॉ. संजय जयस्वाल, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री श्री. कमलेश पासवान, उत्तर प्रदेश सरकारचे आयुष राज्य मंत्री श्री. दयाशंकर मिश्र ‘दयालु’, माजी उपमुख्यमंत्री व आमदार श्रीमती रेणू देवी, भाजप नेते श्री. शिवेश कुमार, जिल्हाध्यक्ष श्री. रूपक श्रीवास्तव, उपजिल्हाध्यक्ष श्री. मनोज सिंह, NRI प्रकोष्ठ बिहार प्रभारी श्री. आनंद मोहन अवस्थी, श्री. प्रतीक एडविन शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये