ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोठारी अपर तहसील कार्यालय परिसरातील संरक्षण भिंत बांधकामासाठी 49.17 लाखांची प्रशासकीय मान्यता

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

चांदा ब्लास्ट

सुरक्षितता आणि सुव्यवस्थेकडे ठोस पाऊल

चंद्रपूर – राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील अपर तहसील कार्यालयाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी 49 लाख 17 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

कोठारी येथील अप्पर तहसील कार्यालयाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. या इमारतीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून 2 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, अंतिम टप्प्यात असलेले हे कार्यालय लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे कोठारी व परिसरातील नागरिकांना तहसील कार्यालयीन सेवा स्थानिक स्तरावरच मिळणार आहेत.

संरक्षण भिंत उभारल्यामुळे कार्यालय परिसर अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित होईल. त्यामुळे नागरिकांना कार्यालयीन कामांसाठी येताना स्वच्छ, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील प्रशासकीय सुविधा अधिक सक्षम व नागरिककेंद्रित बनत आहेत. या मंजुरीमुळे कार्यालयीन कामकाज अधिक सुटसुटीत, जलद आणि सर्वांसाठी सुलभ होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना आवश्यक सेवा मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि व्यवस्थित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये