दुचाकी व ट्रॅक्टरच्या धडकेत तिघांचा मृत्यु
बोथली येथील घटना
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
तालुक्यातील बोथली येथे दुचाकी व ट्रॅक्टरच्या धडकेत तिघांचा मृत्यु झाल्याची घटना (दि. 27) च्या रात्रो 9.00 च्या सुमारास घडली. या अपघातात बोथली येथील साहिल अशोक कोसमशिले (19), बोरचांदली येथील हर्षल संदिप दंडावार (21) आणि भंगाराम तळोधी येथील साहिल नंदु गणेशकर (20) यांचा मृत्यु झाला.
बोथली येथील साहिल अशोक कोसमशिले या मित्राला भेटण्यासाठी दुकाची क्रमांक MH34-L-3229 घेवून हर्षल संदिप दंडावार व साहिल नंदु गणेशकर हे बोथली येथे आले होते. तिघेही मित्र हे रात्रोच्या सुमारास दुचाकीने जवळच असलेल्या हिरापूर येथे नाटक बघण्यासाठी निघाले होते. वाटेतच मार्कंडेय विद्यालयाजवळ ट्रॅक्टर क्रमांक MH34-AP-1042 वळण करीत असतांना दुकाची ने ट्रॅक्टरला धडक दिली. धडक एवढी भिषण होती की, हर्षल संदिप दंडावार हा जागीच गतप्राण झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.
जखमींना सावली येथील ग्रामिण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. सदर तरुण हे गंभीर जखमी असल्याने पुढील उपचाराकरीता त्यांना गडचिरोलीचे सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले परंतु वाटेतच साहिल नंदु गणेशकर याचा मृत्यु झाला तर सामान्य रुग्णालयात साहिल अशोक कोसमशिले याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तिनही तरुणाच्या मृत्युने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पुढील तपास सावलीचे पोलीस निरिक्षक पुल्लुरवार यांचे मार्गदर्शनात सहा.फौजदार चरणदास मडावी, पोशि अमोल गणफाडे, पोशि मोहन दासरवार करीत आहेत