अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेच्या वतीने सावली येथे बेमुदत आमरण उपोषण
मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडनार नाही संघटनेची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
चंद्रपूर जिल्ह्यतील व सावली तालुक्यातील आदिवासी समाजा च्या विविध मागण्या घेऊन अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद यांनी तहसील कार्यालय सावली समोर बेमुदत आमरण उपोषणाला 19तारखे पासून उपोषण सुरू करण्यात आले असून या उपोषणाचे खालील मागण्या आहेत सावली येथील स.क्र. ७९७ व ७९८ ही जागा आदिवासी विद्याथी मुली, मुले यांच्या वस्तीगृहासाठी उपलब्ध करून देण्यात यावे, शासकीय आदिवासी वस्तीगृह बांधकाम करण्यात यावे.12500रिक्त असलेले पदे भरण्यात यावे, चंद्रपूर गडचिरोली येथे सुरु असलेल्या कंपन्या मध्ये १००० आदिवासी सुशिक्षीत युवक युवती पद भरण्यात यावें,२००५ च्या पुर्वीपासुन अतिक्रमित असलेले शासकीय जमिनी आदिवासी समाज बांधव यांना देण्यात यावे, मोजणी करून सातबारा नावाने करुन देण्यात यावा, अनुसूचित विद्यार्थ्याना volvo ऑपरेटर, टायपिंग, कॉम्पुटर प्रशिक्षन देण्यात याव, आदिवासी शबरी घरकुल योजना लाभार्थी यांना दहा ट्रॅक्टर रेती उपलब्ध करून देण्यात याव, चंद्रपूर जिल्यातील आदिवासी समाजातील अपंग पुरुष, महिला, परितक्त्या, विधवा महिलांना उद्योग करण्याकरीता रु. २ लाख आदिवासी विभागाकडून देण्यात यावे. केजी ते पिजी पर्यंत निःशुल्क शिक्षण देण्यात यावे
२१ जुन २०१३ च्या शासन निर्णयात सुधारणा करुन चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी समाजातील सुशिक्षीत युवक, युवतींना उद्योग करण्याकरीता वैयक्तिक १० ते १५ लाख रुपये आदिवासी विभागाकडून देण्यात यावे.
चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी समाजाचे बचत गट, संस्था यांना मोठे उद्योगाकरीता शासनाकडून १० लाख ते २ कोटी पर्यंत निधी मंजुर करण्यात यावा,
चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी असलेल्या प्रत्येक गावां मध्ये ठक्कर बापायोजनेअंतर्गत गोठुल व सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यात यावें,युवा युवतींना पायलट प्रशिक्षण निशुल्क प्रत्येक वर्षाला देण्यात यावे.
चंद्रपूर जिल्हयातील सावली तालुक्यासह प्रत्येक तालुक्यामध्ये नामांकीत एकलव्य किंवा इंग्रजी माध्यम स्कुल व अभ्यासीकेची निर्मीती करण्यात यावी. चंद्रपूर जिल्हयामध्ये आदिवासी विभागामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांकरीता MPSC & UPSC चे क्लासेस १ ते दिड वर्षापर्यंत मोफत देण्यात यावें
आदिवासी समाजाच्या जमीन गैरआदिवासी हडपले त्या जमीन व शासन जमा करण्यात आलेल्या जमीनी आदिवासींना परत करण्यात यावे,
आदिवासी विद्यार्थ्यांना ३२०० रुपये मासिक डीबीटी दिला जाते ती वाढवून ५००० करण्यात यावी. आदिवासी विद्यर्थ्यांना वस्तीगृहामध्ये दरजेदार आहाराचे वाटप करण्यात याचे,
सावली तालुक्यात आदिवासी समाजाने मेळावे घेऊन शासनामार्फत निःशुल्क जातीच्या प्रमाणपत्रे वाटप करण्यात यावे,ठक्करबापा योजनेअंतर्गत प्रस्तावित कामे आदिवासी संस्था व आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार अभियंता यांना देण्याता यावें अशा विविध मागण्या घेऊन
अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद जिल्हा अध्यक्ष अतुल कोडापे चंद्रपूर,अशोक कन्नाके, पुरण बापू मडावी, रमेश कन्नाके, उत्तम गेडाम हे आमरण उपोषणाला बसले असून मागण्या मान्य होई पर्यंत हटणार नसल्याचे संघटने द्वारे बोलले जात आहे
याला सहकार्य तालुका अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सावली प्रविण गेडाम, युवराज उईके, यात्रिका कुमरे, शारदा उईके, छाया नैताम, यांनी समर्थन केले आहे