ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली तालुक्यातील आदिवासींच्या विविध समस्यावर प्रवीण गेडाम यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली तालुका आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखले जात असून सावली तालुक्यातील आदिवासींच्या विविध सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, आर्थिक,सुशिक्षित बेरोजगार रोजगार निर्मिती,घरकुल, आरोग्य अशा विविध समस्या घेऊन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सावली तालुका युवक अध्यक्ष प्रवीण गेडाम यांनी नुकताच झालेला चंद्रपूर येथील पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार डॉक्टर अशोकरावजी उईके साहेब यांच्या भव्य दिव्य नागरी सत्कार समारोहात निवेदन देऊन तालुक्यातील समस्या कडे लक्ष वेधले

सावली तालुक्यातील डिसेंबर महिन्यात झालेल्या आमरण उपोषणातील ठेवण्यात आलेल्या मागण्या जिल्हाधिकारी, तहसीलदार,वन विभाग अंतर्गत येत असलेल्या मागण्या पूर्णत्वास आल्या नसल्याने चौकशी न करता फोल आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

सावली तालुक्यातील आदिवासी घरकुल शबरी योजनेचे लाभार्थ्यांना निशुल्क दहा ट्रॅक्टर रेती, आदिवासी मुलामुलींच्या वस्तीगृहा करित नवीन इमारतीसाठी जागा व निर्मिती बांधकाम करणे,आरोग्याच्या उत्तम समस्या उपलब्ध करणे, आदिवासी शेतकरी शेतमजुरांना शेती उपयोगी उपकरणे उपलब्ध करून देणे, सुशिक्षित युवक युवतींना शासकीय नोकऱ्या, कंपन्यामध्ये आदिवासींच्या मुलांना रोजगार, बेरोजगारांना रोजगार निर्मिती करणे अशा विविध मागण्यांवर पालकमंत्री महोदय डॉक्टर अशोकरावजी उईके यांच्यासोबत चर्चा करून अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद सावली तालुका अध्यक्ष प्रवीण गेडाम यांनी निवेदनातून मागणी करण्यात आली असून सावली तालुक्याच्या विकासाकरिता पालकमंत्री कितपत लक्ष घालतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये