ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरासमोर कचरा टाकण्यावरून वाद

लोखंडी रॉड चालला परस्परविरोधी तक्रारीवरून सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यातील उंबरखेड येथे घरासमोर कचरा टाकण्यावरून तसेच इतर शुल्लक कारणावरून दोन्ही कुटुंबात मारहाण झाल्याची घटना दिनांक एक फेब्रुवारी रोजी घडली परस्पर विरोधी तक्रारीवरून एकूण सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की प्रथम घटनेत फिर्यादी शिवानंद प्रकाश कायंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घटनेतील आरोपी हे फिर्यादीच्या घरी आले आणि त्यांच्या पत्नीस तुझ्या घरातील कचरा माझ्या जागेत टाकू नकोस असे म्हणून पत्नी शिवीगाळ तसेच नितीन दुसऱ्या आरोपीने लोखंडी रॉड घेऊन घरात बसून फिर्यादीचे पडल्याच्या डोक्यात रॉड म्हणून गंभीर जखमी केले.

तसेच त्यांच्या आईच्या सुद्धा डोक्यात रोड मारून जखमी केले यावरून फिर्यादी यांनी वडिलांस का मारले असे विचारले असता फिर्यादी तसेच फिर्यादीच्या पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली यावरून आरोपी शिवकन्या गणेश सांगळे तसेच किशोर गणेश सांगळे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये पुन्हा दाखल करण्यात आला असून याच घटनेत परस्पर विरोधी तक्रार दिल्यावर शिवकन्या गणेश सांगळे घटनेतील आरोपी आरोपी यांनी धरून खाली पडून आमच्या विरुद्ध रिपोर्ट दिलेला रिपोर्ट हा मिटला असून आता तुला दाखवतो असे म्हणून मारहाण केली तसेच शिवीगाळ केली.

  या दोन्ही फिर्यादीवरून दोन्ही कुटुंबातील एकूण सह आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये शिवकन्या गणेश सांगळे, किशोर गणेश सांगळे तसेच दुसऱ्या घटनेतील आरोपी शिवानंद कायंदे, देवानंद कायंदे, प्रकाश कायंदे, केतन कायंदे सर्व राहणार उंबरखेड यांच्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला विविध मानवी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही घटनेचा तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये