जांभोरा येथे कायदे विषयक शिबीर संपन्न
तालुका विधी समिती तथा तालुका वकील संघाच्या वतीने शिबीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तालुका विधी सेवा समिती तथा तालुका वकील संघ देऊळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमानेजांभोरा या ठिकाणी कायदे विषयक शिबीर संपन्न झाले.
ग्राम जांभोरा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या प्रनांगणात शिबिराचे आयोजन करून गावातील महिलापुरुष, शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश कोर्ट क्र. 1 कु. श्वेता परिहार या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून दिवानी न्यायालयाचे न्या. क्र. 2 चे न्यायाधीष श्री एच एम.बेग हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये तालुका वकील संघांचे उपाध्यक्ष ऍड विणकर, सचिव ऍड सलमान सय्यद, तर न्यायालयाचे सरकारी वकील श्री अनिल शेळके हे होते.तर कार्यक्रमचे अध्यक्ष कु परिहार यांचे गावाकऱ्याच्या वतीने सरपंच वच्छलाताई सदाशिव डुरे यांनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.
शिबिराचे उत्कृष्ट नियोजन हे वकील संघांचे सदस्य ऍड मनीष कापसे यांनी केले होते या शिबिरा मध्ये नागरिकांचे मुलभूत अधिकार आणि कर्तव्य यावर ऍड विणकर यांनी मार्गदर्शन केले तर वाहनाचे नियम व अटी यावर देऊळगाव राजा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले तसेच ऍड सलमान सय्यद यांनी प्रकरणे मध्यस्ती केंद्रात ठेवल्याने पक्षांकारांचे फायदे या बद्दल माहिती दिली.तदनंतर अध्यक्षीय भाषण हे दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्या. कु श्वेता परिहार यांनी केले.
कायदेविषयक शिबिरास तालुका वकील संघातील जेष्ठ सदस्य ऍड विघ्ने, ऍड मिनासे, ऍड ठाकरे, ऍड वायाळ, ऍड घेवंदे, ऍड खरात, ऍड, इंगळे, ऍड उपाध्ये, ऍड रामाने, ऍड नरोडे, ऍड डोईफोडे,ऍड सुनगत, ऍड खैरे, ऍड डोणगावकर, ऍड ठुमके,ऍड वाघ , ऍड मांटे ऍड निलेश रामाने, ऍड.घुगे व महिला विधज्ञ ऍड गजभिये, ऍड आघाव, ऍड तिडके, ऍड विघ्ने या उपस्थित होत्या तर पोलीस स्टेशनं चे महिला पोलीस कॉन्स्टबल नांदे, पो. हे. कॉ गवई हे हजर होते तसेच न्यायालयिन कर्मचारी वृंद हजर होते तर शिबीर उत्कृष्ट पार पाडणेसाठी ऍड मनीष कापसे, ज़िल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापिका सौं गचके मॅडम, ग्रामसेवक जाधव मॅडम यांनी सहकार्य केले.