कोंबडयांचे झुजीवर चालनाऱ्या जुगार अड्डयावर जुगार रेड
आरोपीतांचे ताब्यातुन ६ कोंबडयांसह एकुण ३ लाख ३६ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. २९/१०/२०२५ रोजी स्थानीक गुन्हे शाखेचे पथक मा. पोलीस निरीक्षक सा. स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांचे आदेशाने उप विभाग वर्धा परीसरात अवैध्य व्यवसायावर कार्यवाही करने करीता पेट्रोलींग करीत असतांना मुखबीर कडुन गोपनीय माहीती प्राप्त झाली की, मौजा हिवरा (साखरा) ता. सेलु जिल्हा वर्धा परीसरात काही ईसम कोंबडयाचे पायांना लोखंडी धारदार कात्या बांधुन त्यांची आपसात झुंज लावुन त्यावर स्वतःचे आर्थीक फायदया करीता पैशाचा हारजीतीचा जुगार खेळ खेळत आहे.
अशा माहीती वरून स्थानीक गुन्हे शाखेचे ०३ पथक हे मौजा हिवरा (साखरा) परीसरातील धामनदीचे काठावर माहीती प्रमाणे गेले असता सदर ठिकाणी काही ईसम कोंबडयाचे पायांना लोखंडी धारदार कात्या बांधुन त्यांची आपसात झुज लावुन त्यावर स्वतःचे आर्थीक फायदया करीता पैशाचा हारजीतीचा जुगार खेळ खेळत असतांना दिसुन आले. त्यांचेवर घेराव टाकुन जुगार रेड केला असता ईसम नामे – १) सुरज रामदास पवार, वय ३८ वर्षे, रा. हमदापुर ता. सेलु जि. वर्धा, २) सुनीलदास रामदास पवार, वय ४४ वर्षे, रा. हमदापुर ता. सेलु जि. वर्धा, ३) रविंद्र मारोती उईके, वय ४० वर्षे, रा. दिंदोडा (मदनी) ता. जि. वर्धा, ४) पुजाराम मारोती तुमडाम, वय ७८ वर्षे, रा. कोटंबा ता. सेलु जि. वर्धा, ५) निकेश बंडुजी लोटे, वय ३७ वर्षे, रा. तरोडा, ता. जि. वर्धा हे जागीच मिळुन आले व काही ईसम त्यांचे ताब्यातील मोटर सायकल जागीच सोडुन पळुन गेले. त्यांचे ताब्यातुन १) सहा जिवंत कोंबडे, २) कोंबडयांचे झुंजी करीता वापरनारे पाच लोखंडी धारदार कात्या, ३) जुगाराचे नगदी, ४) चार मोबाईल, ५) जुगाराचे ठिकाणी येणे करीता वापरत असलेल्या सहा मोटर सायकल असा एकुण जु. किंमत ३,३६,१९०/- रु चा माल मिळुन आल्याने सर्व आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे) येथे अप. कमांक २७६/२०२५ कलम १२ (ब) महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही – मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनी. पोउपनी विजयसिंग गोमलाडु, पोउपनी प्रकाश लसुंते, पोलीस अंमलदार हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, शेखर डोंगरे, भुषन निघोट, अमर लाखे, धर्मेंद्र अकाली, अमरदिप पाटील, अमोल नगराळे, मंगेश चावरे, विकास मुंडे, सुगम चौधरी, शुभम राउत सर्व नेमणुक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा, यांनी केली.



