ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांवगी मेघे पोलीसांकडुन गौण खनीज (रेती) चे अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 28.10.2025 रोजी रात्री 23:20 वा चे सुमारास पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील अंमलदार यांना गुप्त माहिती मिळाली की मौजा महाकाळ येथील धाम नदीचे पात्रातून एका ट्रॅक्टरमध्ये काळी रेती रेतीचे (गौण खनीजाचे) भरून मौजा महाकाळ येथून येळाकेळी गावच्या दिशेने रेतीची अवैधरीत्या वाहतूक करीत आहे, अशा माहितीवरून पंच व पो. स्टाफसह मौजा येळाकेळी येथे पोहचून येळाकेळी ते महाकाळ दरम्यान रोडवर नाकेबंदी करीत असता महाकाळ गावाकडून एक हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर येळाकेळी गावाकडे येताना दिसला, त्यास थांबवून पाहणी केली असता ट्रॅक्टर चालक आरोपीचे ताब्यातून 1) एक शेंदरी रंगाचा टुबोटा कंपनीचा ट्रॅक्टर ज्यावर नंबर नसलेला व ट्रॅक्टरची ट्रॉली नंबर नसलेली एकुण किं. 7,00,000/रू. 2). एक ब्रास (100 फुट) काळी ओलसर रेती किं. 7,000/ रू. असा एकुण जु.किं. 7,07,000/रू. चा मुद्देमाल शासनाचा महसुल चुकवुन रेतीची (गौणखनीज) अवैद्यरित्या बिना पासपरवाना रेतीची चोरी करून वाहतूक करताना मिळुन आल्याने आरोपी ट्रॅक्टर चालक आरोपी नामे 1) सौरभ राजु फुन्ने वय 22 वर्ष व ट्रॅक्टर मालक 2) संदिप यशवंतराव महाकाळकर वय 44 वर्ष दोन्ही रा. महाकाळ, ता.जि. वर्धा यांचे विरुध्द पो.स्टे. ला अप.क. 836/2025 कलम कलम 303 (2). बि.एन.एस. सहकलम 4, 21 खान खनिज अधि. 1957, सहकलम 3(1), 181, 130/177 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज वाघोडे सा, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे व पोलीस स्टाफ पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये