ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथील बालाजी महाराज यात्रेत गरमा गरम चुलीवरचे मांडे 

तुळजापूरच्या महिलांचा अभिनव उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     देऊळगाव राजा येथील प्रति बालाजी यात्रेत काहीतरी खास आहे… देवदर्शनाइतकंच लोकप्रिय झालंय इथलं एक हॉटेल…

 कारण इथे मिळतोय गरमा गरम चुलीवरचा पारंपरिक ‘मांड्या’चा स्वाद!”

तुळजापूर येथील सुजाता स्व-सहायता बचत गटाच्या महिलांनी ही भन्नाट कल्पना साकार केली आहे.

जिथं यात्रा, तिथं चुलीवरचे मांडे – हेच त्यांच्या व्यवसायाचं ब्रीदवाक्य बनलं आहे.”

 वंदना कांबळे ,सुरेखा कोल्हे, ईदुबाई सुलताने या सुजिता स्व- सहायता बचत गटाच्या माध्यमातून सर्वांना पोटभर जेवण करण्याची संधी त्यांनी यात्रेत घडून आणली आहे ,त्यांना त्यांची मैत्रीण पत्रकार सौ किरण ताई वाघ या सुद्धा त्यांना सहकार्य करत आहे.

या हॉटेलवर फक्त स्थानिकच नाही, तर दूरदूरवरून आलेले भाविकही थांबतात.

एका बाजूला भक्ती, तर दुसऱ्या बाजूला स्वादिष्ट मांडे – हीच यात्रेची खरी रंगत!”

“मांडे खूप मस्त लागतात. असं पारंपरिक चुलीवरचं खाणं सध्या फारसं मिळत नाही.”

“स्वयंपूर्णतेकडं वाटचाल करताना या महिला स्वावलंबनाचा आदर्श घालून देत आहेत.

मुलींना रोजगार, महिलांना आत्मविश्वास आणि ग्राहकांना घरगुती चव – हे या उपक्रमाचं यश आहे.”

“ही विदर्भातील बदलती वाट आहे ,जिथे महिलांनी घेतलेला पुढाकार समाजात सकारात्मक बदल घडवतो आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये