ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ रामभरोसे! – राजेश बेले

चांदा ब्लास्ट

जिल्ह्यामध्ये घातक प्रदूषण प्रदूषणामुळे अनेक आजार मानवी जीव, पाळीव प्राणी, वन्यप्राणी, पक्षीयांना, वायु प्रदूषण जल प्रदूषणामुळेखूप मोठा घातक आजार व मृत्यू होण्याचे शक्यता नाकारता येत नाही.
चंद्रपूर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर या कार्यालयात मनुष्यबळ (अधिकारी वर्ग) नसल्यामुळे जिल्हयातील वाढते प्रदुषण लक्षात घेता तत्काळ मनुष्यबळ (अधिकारी वर्ग) देण्यात यावा अन्यथा दिनांक 18 जुलै 2023 रोजी घंटानाद आंदोलन करुन तिव्र निषेध जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र प्रदुषण मंडळ चंद्रपूर कार्यालय परिसरात करण्याबाबत  संजीवनी पर्याय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, अध्यक्ष, सदस्य सचिव, प्रादेशिक अधिकारी, उप प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हा अधिकारी यांना आंदोलनाची तक्रार दिली.
चंद्रपूर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर या कार्यालया अंतर्गत येणारे जिल्हे चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, गडचिरोली जिल्हा येत असते वेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर या कार्यलयात फक्त एक उपप्रादेशिक अधिकारी यांच्या रामभरोश्यावर तीन जिल्हयाच्या कामाची जिम्मेदारी असल्यामुळे प्रदुषण ग्रस्त जिल्हयातील प्रदुषण कमी करण्याकरीता उपाय योजनेसाठी मुनष्यबळ आवश्यक आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये