ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरदोना येथे बाल मेळावा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हरदोना (खु) येथे बाल मेळावा घेण्यात आला. त्यामध्ये आकाश कंदील, कागदी टोप्या, टोपली अशा अनेक वस्तू बनविण्यात आले. गाणे गोष्टी घेन्यात आले.

 बाल मेळाव्याचा एकंदरीत उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे. आणि त्यांच्या मध्ये असलेल्या कलागुणांचा विकास करणे हा मुख्य हेतू होता.

सदर बाल मेळावा हा अंबुजा सिमेंट लिमिटेड च्या CSR उपक्रमांतर्गत अंबुजा फाउंडेशन शिक्षण विभागाच्या समन्वयक सरोज अंबागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. बाल मेळाव्याचे आयोजन कम्युनिटी मोबेलायझर हर्षाली खारकर, पुस्तकपरी संजीवनी पेरगार, पपीता भसारकर, पोर्णिमा डोईफोडे, शैला मडावी यांनी केले.

शाळेतील मुख्याध्यापक श्री सुधाकर जाधव, सर्व शिक्षक आणि एकूण 104 विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये