ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली येथे काँग्रेस तर्फे पदवीधर मतदार नोंदणीचा शुभारंभ 

विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती 

चांदा ब्लास्ट

तालुका काँग्रेस कमिटी सावलीच्या वतीने आगामी काळात होऊ घातलेल्या पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदार नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ विधिमंडळ पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

आयोजित  मतदार नोंदणी शिबिरास प्रामुख्याने माजी बांधकाम सभापती दिनेश चिटणुरवार,माजी जि.प.सदस्य ॲड.राम मेश्राम,माजी तालुका अध्यक्ष बंडू बोरकुटे,तालुका अध्यक्ष नितीन गोहने,महिला तालुका अध्यक्ष उषा भोयर,शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,माजी प.स.सभापती राकेश गड्डमवार,माजी प.स.सभापती विजय कोरेवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू ठाकरे,माजी उपसभापती दिवाकर भांडेकर,नगराध्यक्ष साधना वाढई,युवक तालुका अध्यक्ष किशोर कारडे,महिला शहर अध्यक्ष भारती चौधरी यांचे सह तालुका काँग्रेस कमिटीच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शनपर बोलताना विधिमंडळ पक्षनेते त्याचा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्रत्येक पदवीधर मतदाराने आपली मतदार यादीत यशस्वीरित्या नोंद करून मतदानाचा हक्क बजावावा व देश कार्यात पुढाकार घ्यावा. आगामी होऊ घातलेल्या निवडणुका काँग्रेस निश्चितच बाजी मारेल आणि जनतेच्या समस्या सोडविण्यास सदैव अग्रेसर राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मतदान करणे हे जागरूक नागरिकाचे आद्य कर्तव्य असून प्रत्येक पात्र मतदाराने या संविधानिक अधिकारापासून वंचित राहू नये करिता आपण जागरूक राहावे. असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सभापती दिनेश चिटनूरवार यांनी केले. तर पदवीधर मतदार नोंदणीत काही अडचण आल्यास तालुका काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन आपल्या समस्येचे निराकरण करावे. असे आवाहन काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष नितीन गोहणे यांनी केले. आयोजित मतदार नोंदणी कार्यक्रमास सावली तालुक्यातील शेकडोंच्या संख्येने नवीन मतदारांनी उपस्थितीत दर्शविली कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता तालुका काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये