ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्ते,शौचालय, नाल्या, बाजारातील अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करा : सुयोग भोयर यांची मागणी

नमो उद्यानकरिता आलेला निधीतून प्राथमिक गरजा पूर्ण करा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         शहरातील संपूर्ण प्रभागात रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. पावसामुळे नाल्या अनेक ठिकाणी कोसळल्या तर कुठे बंद झाल्या आहेत. बाजार लाईन मध्ये जुना पोलीस स्टेशन जवळ संडास बाथरूम कित्येक महिन्यापासून बंद पडले असून आजू बाजूला दुर्गंधी व घाण पसरली आहे. जामा मस्जिद जवळ सुरु असलेले रोडचे काम गेल्या दीड वर्षापासून खोदून अर्धवट रखडलेले आहे.

ज्यामुळे कित्येक अपघात तिथे झाले आहे. येत्या आठवद्यात कामाची सुरुवात न झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल.तसेच नमो उद्यानकरिता आलेला निधी हा गावाच्या प्राथमिक गरजाकरिता त्वरित खर्च करण्यात यावा.अन्यथा शिवसेना (उबाठा) स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा भद्रावती-वरोरा विधानसभा प्रमुख सुयोग भोयर यांनी दिला आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर,तहसीलदारभद्रावती,

 प्रतिभाताई धानोरकर, खासदार चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्र करण देवतळे, आमदार वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र यांना पाठविण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये