ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनुदानासाठी निराधार महिलांचा तहसील कार्यालयात ठिय्या _ अनेक लाभार्थी अनुदानापासून वंचित

कुटुंब अर्थसाहाय योजनेचे दोन वर्षांपासून १०६ लाभार्थ्यांचे अनुदान प्रलंबित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली :- वृद्ध, अपंग, विधवा निराधार महिला पुरुषांचे अनुदान नियमित होत नसल्याने सावली तहसील कार्यालयात माजी सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात महिलांनी ठिय्या मांडला. कुटुंब अर्थसाहाय योजनेतील दोन वर्षांपासून थकीत असलेले अनुदान तात्काळ देण्याची मागणी केली.

        सामाजिक न्याय विभागामार्फत निराधार व्यक्तींना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, कुटुंब अर्थसाहाय योजनेचा लाभ दिल्या जातो. मात्र सावली तालुक्यात या योजनेतील लाभार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. नियमित लाभ मिळावा याकरिता लाभार्थी वारंवार कार्यालयात मागितलेली कागदपत्र जमा करतात मात्र तिच ती कागदपत्र पुन्हा पुन्हा मागवतात. वृद्ध, विधवा, अपंग यांना अनुदान मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे आज महिलांनी माजी सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात कार्यालयात ठिय्या मांडला.

यावेळी माहे जानेवारी महिन्यापासून थकीत असलेले अनुदान देण्यात यावे, फरवरी ते ऑगष्ट महिन्यापर्यंतचे थकीत अनुदान देण्यात यावे. नवीन लाभार्थ्यांचे अर्ज माहे मार्च, जून २०२५ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यात यावे. कुटुंब अर्थसाहाय योजनेंतर्गत २० हजार रुपयाचे अनुदान दिल्या जाते मात्र मागील दोन वर्षांपासून लाभ दिल्या गेले नाही त्या १०६ लाभार्थ्यांना अनुदान देण्यात यावे. ही मागणी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार मडावी यांचे निर्देशनुसार प्रत्येक लाभार्थ्यांचे अनुदान चेक करून माहिती देण्यात आली व कुटुंब अर्थसाहाय योजनेचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक प्रितम गेडाम, मुन्ना रस्से, अंजु बोरेवार, राजू कंचावार, श्रीकांत बहिरवार, रोशन बोरकर, वैभव कोरगंदेवार आदी कार्यकर्ते व शेकडो लाभार्थी उपस्थित होते.

लाडकी बहीण योजनेप्रमाणे निराधार योजनेसाठी उत्पन्न मर्यादा अट शिथिल करावी

निराधार योजनेंतर्गत अंध, अपंग, विधवा, दुर्धर आजारी यांचेसाठी संजय गांधी निराधार योजना, वयोवृद्ध व्यक्तींसाठी श्रावणबाळ निराधार व कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंब अर्थसाहाय्य योजना राबविली जाते. मात्र एकीकडे लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्न मर्यादा २.५० लाख रुपये असतांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनेसाठी फक्त २१ हजाराचे आतील उत्पन्न मर्यादा आहे. अपंग व्यक्तींसाठी ५० हजार रुपये उत्पन्न मर्यादा आहे तर कुटुंब अर्थसाहाय योजनेसाठी दारिद्र्य रेषेखालील (बिपीएल ) आवश्यक आहे. या उत्पन्न मर्यादेच्या जाचक अटीमुळे अनेक गरजू व्यक्ती या योजनेपासून वंचित आहेत.

त्यामुळे लाडकी बहीण योजनेप्रमाणे निराधार योजनेसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा २.५० लाख रुपये करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री यांचेकडे तहसीलदार यांचे मार्फतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये