ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी येथे प्रारंभ २K२५ कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी येथे फ्रेशर्स पार्टी प्रारंभ २०२५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष पी.एस आंबटकर, प्राचार्य राजदा सिद्दकी, प्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे, उपप्राचार्य डॉ. उज्वला सावरकर, प्राचार्य जमीर शेख, उपप्राचार्य अनिल खुजे सर, प्राचार्य मोजस सर, प्राचार्य जोगे सर, रजिस्ट्रार राजेश बिसन सर उपस्थित होते, सर्वप्रथम प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष पी.एस आंबटकर, डॉ. धानोरकर सर, प्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे यांचा हस्ते दीप प्रज्वलन करीत नटराजचा मूर्तीला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे ह्यांनी केल्यानंतर संस्था अध्यक्ष पी.एस आंबटकर ह्यांनी विधार्थांशी संवाद साधला त्यामध्ये विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने आणि सातत्याने अभ्यास करावा व जास्तीत जास्त गुण मिळवून विद्यार्थ्यांशी यशस्वी व्हावे त्याकरिता विद्यार्थ्यांशी संस्थेतर्फ सर्व प्रकारचे मार्गदर्शन करायचे अभिवचन दिले तसेच जे विद्यार्थी गुणानुक्रमे उत्कृष्ट गुण प्राप्त करतील त्यांना संस्थे तर्फ लॅपटॉप आणि टॅब देण्यात येईल असे घोषित केले.

प्रारंभ २K२५ च्या आयोजनामध्ये विद्यार्थी करीता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तसेच सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि कॉलेज तर्फे फॅशन शो, डान्स शो, रॅम वॉक, गायन स्पर्धा घेण्यात आले, तसेच यात विजयी व उपविजयी स्पर्धकांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

तसेच सोलो व ग्रुप डान्स मध्ये प्रथम क्रमांक ग्रुप रिदम रेबल, द्वितीय क्रमांक महेक टेम्भूर्णे, तृतीय क्रमांक टीम श्री यांनी पटकाविला. गायन स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक कशिश रोगे व महाविष खान, द्वितीय क्रमांक अभिषेक शुक्ला व प्रांजली बावणे, तृतीय क्रमांक समीर मेश्राम प्रथम वर्षातील विधार्थीनी पटकाविला. मिस्टर सोमय्या बेस्ट वॉक अँड कॉस्ट्यूम अनमोल चव्हाण इलेकट्रीकल विभागातील प्रथम वर्षातील विधार्थीला देण्यात आले. मिस. सोमय्या बेस्ट वॉक अँड कॉस्ट्यूम महेक टेम्भूर्णे डेटा सायन्स विभागातील प्रथम वर्षातील विधार्थीनीला देण्यात आले.

प्रमुख पाहुण्यानी आपले मनोगत वक्त करीत आपण ज्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतो, ज्या क्षेत्राची आवड आहे, अशा क्षेत्राची करिअरसाठी निवड करावी, केवळ क्षेत्र आवडल्याने यश मिळत नाही तर करिअर निवडल्यानंतर ज्या क्षेत्रात अविरत निष्ठने काम केल्यास यश मिळते. स्पर्धा परीक्षाक्षेत्र शिगेला पोहोचली आहे. पाहुण्यानी आपले मनोगत वक्त करीत, अधिकारी बनल्यानंतर देश सेवा डोळ्यासमोर ठेऊन कार्य करण्याचे आव्हान त्यांनी उपस्थित विद्यार्थाना केले तसेच अन्य मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले.

तसेच त्यांनी विद्यार्थाना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली व उज्वल भविष्याबद्दल शुभेच्या दिल्या, यशावर आणि प्रगतीवर प्रतिबिंबित करण्याची आणि भविष्यासाठी उद्दिष्टे निश्चित करण्याची ही संधी असते. शिक्षकांचे मार्गदर्शन यातून आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात होते. शिक्षकांचे मार्गदर्शन यातून आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात होते. आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस आहे, मनोबल वाढवण्यासाठी, समुदायाची भावना वाढवण्यासाठी आणि ध्येयाप्रती बांधिलकी मजबूत करण्यासाठी हे एक शक्तिशाली साधन आहे. सूत्र संचालन प्रा. नौशाद सर यांनी केले.

ह्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता संस्थेतील सर्व विभागातील विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थांनी प्रयत्न केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये