महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर “मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन” विषयक प्रबोधन कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर, येथील अंतर्गत तक्रार निवारण समिती व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने UJAAS उपक्रमाअंतर्गत “मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन” (Menstrual Hygiene Management) या विषयावर प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेन्द्र डी. देव होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रगती निशा प्रभुदास (जिल्हा समन्वयक, उजास) यांनी विद्यार्थिनींना प्रजनन प्रणालीची माहिती, मासिक पाळी चक्रामध्ये कार्य करणारे हार्मोन्स, मासिक पाळीदरम्यान स्वच्छता कशी राखावी तसेच मानसिक आरोग्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
विशेष अतिथी म्हणून ऋतु पाहनपाटे (समन्वयक मानसिक आरोग्य) व अगस्तिन गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. शैलेन्द्र देव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांची सामाजिक जबाबदारी अधोरेखित करताना “मासिक पाळी स्वच्छतेबाबत जनजागृती करणे ही आजच्या पिढीची महत्त्वाची जबाबदारी आहे” असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चेतन डी. वैद्य (समन्वयक, अंतर्गत तक्रार निवारण समिती) यांनी केले. शेवटी त्यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.