8 ऑक्टोबर पासून ग्रामीण गृहनिर्माण अभियंता चे काम बंद आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ग्रामीण गृहनिर्माण अभियंता संघटना, चे जिल्ह्यातील सर्व अभियंता 8 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे संघटनांने प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद बुलढाणा यांना निवेदनातून कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामीण अभियंते माहे एप्रिल 25 पासून मानधन पासून वंचित आहे,तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचे कडून अभियंता यांना हीन वागणूक मिळत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मानधन न मिळाल्याने दिवाळी अंधारात जाणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याने 8 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन सुरू करणार असल्याचे म्हटले आहे, अभियंता च्या विविध समस्या असून त्या तातडीने सोडविण्यात याव्या अशी मागणी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत काकडे व सहसचिव वैभव वतपाळ , यांनी केली आहे