ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन व अतिथी व्याख्यान संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

स्थानिक सावली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावली येथील राज्यशास्त्र विभागाअंतर्गत राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटन सोहळ्याचे व अतिथी व्याख्यानाचे आयोजन नुकतेच उत्साहात करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. चंद्रमौली होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रविण उपरे, कर्मवीर महाविद्यालय, मुल येथून उपस्थित होते.

या कार्यक्रमात “राज्यशास्त्र विषयाचे महत्व व करिअर संधी” या विषयावर डॉ. उपरे यांनी सविस्तर व माहितीपूर्ण व्याख्यान दिले. त्यांनी राज्यशास्त्र विषयाच्या व्यापकतेबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्पर्धा परीक्षा, प्रशासनिक सेवा, संशोधन क्षेत्र, सामाजिक कार्य आदी क्षेत्रांतील संधींवर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक खोब्रागडे यांनी आयोजनाची जबाबदारी पार पाडली. त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करत कार्यकारिणीची घोषणा केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उल्हास मोहुर्ले यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. रामचंद्र वासेकर यांनी केले.

या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, राज्यशास्त्र विषयाची उपयुक्तता व भविष्यातील संधी यांची स्पष्ट जाणीव यानिमित्ताने विद्यार्थ्यांना झाली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये