
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शहरातील समतानगर येथे पैशाच्या वादातून एका युवकाला मारहाण केल्याची घटना 5 ऑक्टोंबर रोजी दुपारी घडली या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, समता नगर येथे आकाश खंदारे यास सोयाबिनचे इसाराचे पैसेच्या कारणावरुन आरोपी समाधान मोरे यांनी उजवे हातांवर विळा मारुन जख्मी केले. तसेच अन्य आरोपी निमा, अणु, गोपाल यांनी शिवीगाळ करून मारहाण केली व जिवे मारण्यची धमकी दिली.विशाल घुले याने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी 4 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टेबल नायबराव मोगल करीत आहे.