7 ऑक्टोंबर रोजी देऊळगाव राजा येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकी संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन देऊळगाव राजा तालुका/शहर काँग्रेस कमिटीचे वतीने 7 ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, देऊळगाव राजा येथे करण्यात आले आहे.
बैठकीसाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री राजेंद्रजी राख साहेब, सिंदखेडराजा मतदारसंघाचे काँग्रेस निरीक्षक श्री सुरेशजी गवळी, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री राहुल भाऊ बोंद्रे यांचे उपस्थिती मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तालुक्यातील/शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.
असे आवाहन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल सावजी, रमेश दादा कायंदे,तालुका अध्यक्ष रामदास डोईफोडे, शहर अध्यक्ष आतिश कासारे यांनी केले आहे.