भाजपाचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा काँग्रेसमध्ये भव्य प्रवेश
लोकशाही वाचविण्याच्या लढाईत सहभागी होण्याचा निर्णय; नागपूर प्रेस क्लब येथे प्रवेश सोहळा पार पडला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने
वरोरा :_ येथील नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, भाजपचे माजी जिल्हा सचिव तसेच भाजप अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अहेतेशाम अली यांनी आपल्या शेंकडों समर्थकांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात भव्य प्रवेश केला. नागपूर येथील प्रेस क्लब मध्ये आयोजित या पक्षप्रवेश सोहळ्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ, चंद्रपूर लोकसभेची खासदार प्रतिभा धानोरकर, तसेच अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
*भाजपमधून काँग्रेसमध्ये मोठा बदल*
माजी नगराध्यक्ष अहेतेशाम हे गेली दहा वर्षे भारतीय जनता पक्षात कार्यरत होते. २०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी भाजपच्या चिन्हावर थेट जनतेतून सर्वाधिक मतांनी विजय मिळवून नगराध्यक्ष पद मिळवले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात विकासाभिमुख कार्य करून आपले नेतृत्व कौशल्य सिद्ध केले होते. यापूर्वी एनएसयुआय, युवक काँग्रेस मधून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती. काँग्रेसचे ते वरोरा शहराध्यक्षही राहिले असून राज्याचे माजी मंत्री स्व. संजय देवतळे यांच्या सहवासात त्यांनी जनसेवेचे धडे घेतले होते. २०१४ मध्ये त्यांनी संजय देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश केला होता.
*काँग्रेसच्या नेतृत्वावर विश्वास*
आजच्या काळात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी पुन्हा काँग्रेसकडे पुनरागमन केले आहे. चंद्रपूर लोकसभा खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सर्व समावेशक व धाडसी नेतृत्वाने प्रेरित होऊन त्यांनी “लोकशाही वाचवण्याचा लढाई सहभागी होण्याचा निर्धार” व्यक्त केला.
*कार्यकर्त्याचा भव्य प्रवेश*
नागपूर येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्याला अहेतेशाम अली यांच्या समर्थकांची मोठी उपस्थिती होती. कार्यकर्त्यांनी जल्लोषात घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते व विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. पक्ष प्रवेश सोहळ्यात तुळशीराम श्रीरामे, दादापाटील झाडे, अशरफ खान, सादिक अली, शाहिद अली, धर्मेंद्र हवेलीकर, अनिल खडके, माजी सरपंच मारुती झाडे, गणेश जोगी, जयंत चंदनखेडे, सुभाष वाटकर, चंद्रकला मते, जितू कांबळे, गणेश बदकी, सुधाकर कुंकुले, लक्ष्मण नेहारे, संदीप विधाते, सुनील बिंजवे, आतिश बोरा, कादर शेख, सुनील हलमारे, पवन वरघने, बाबू शेख, हरिश्चंद्र चांभारे, इमरान शेख, पवन डांगरे, सुनील गेडाम, योगेश फुलझले, वसीम शेख, रवी पवार, आदेश मेश्राम, रमेश मते, फिरोज शेख, अरविंद खोकले, साबिर शेख, लेखू केशवानी, विजय धोपटे, विजय लांबट, पंकज शिंदे, अनिता शहा, सीमा वाकडे, राधा पर्वत, सावी भगत, निलोफर शेख यांच्या सह असंख्य कार्यकत्यांनी प्रवेश केला.
*अहेतेशाम अली यांचे वक्तव्य*
“काँग्रेस हा विचारांचा पक्ष आहे. लोकशाही, संविधान आणि सर्वसमावेशकतेच्या मूल्याचे रक्षण करण्यासाठीच मी पुन्हा काँग्रेसमध्ये आलो आहे. सामान्य जनतेचा आवाज बनून त्यांच्यासाठी लढण्याचा माझा संकल्प आहे.”
– *अहेतेशाम अली, माजी नगराध्यक्ष*