मराठ्यांचं कुणबीकरण (OBC) करणारा शासन निर्णय रद्द करण्यासाठी महामोर्चा
नागपूर येथील महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करताना समाजबांधव

चांदा ब्लास्ट
मराठ्यांचं कुणबीकरण (OBC) करणारा 02 सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय रद्द करण्यासाठी 10 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता यशवंत स्टेडियमपासून संविधान चौक, नागपूरपर्यंत (3KM) महामोर्चा निघणार आहे. त्यासंदर्भात धनोजे कुणबी समाज मंदिर, लक्ष्मीनगर, चंद्रपूर येथे समाज मंदिराचे अध्यक्ष श्रीधरराव मालेकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 04 ऑक्टोबर 2025 ला सायं. 6.00 वाजता सभा पार पडली. सभेला विचारपिठावर उपाध्यक्ष संजय ढवस, सचिव अतुल देऊळकर, अँड. पुरुषोत्तम सातपुते, प्रा. सुरेश विधाते, सरदार पावडे, ओबीसी सेवा संघाचे सचिव विलास माथनकर, पप्पु देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नामदेव मोरे यांनी केले. अध्यक्ष भालेकर यांनी ओबीसी महामार्चाचे योग्य नियोजन व्हायला हवे होते. मोर्चा चार दिवसांवर येऊन पोहचला तरी नियोजनचा अभाव असल्याची खंत व्यक्त केली.
याशिवाय समाजबांधवांतर्फे निळकंठ पावडे, अजय बलकी, सतिश मालेकर, भास्कर सपाट यांनीही विचार मांडले. मान्यवरांनी समाजबांधवांनी नागपूर येथील महामार्चात जाण्यासाठी विविध प्रचारात्मक पोस्टर्स, बॅनर, मिडिया तसेच वार्डनिहाय प्रत्येकाला जबाबदारी देऊन येणाऱ्या नागरिकांची यादी करणे व त्यांना महामोर्चात आणणे आदी नियोजन करण्यात आले.