ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी जागोजागी धम्मदीक्षा सोहळा घ्या !

भदंत हर्षबोधी महास्थवीर : ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :- डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक बुध्द आहेत. त्यानी आपल्याला स्वाभीमानाचे,मानवतेचे जीवन दिले.मानवतावादी, परिवर्तनवादी बुध्द आहे.हा देश बाबासाहेबाच्या संविधानाने चालतो.आपण सकारात्मक विचार केला पाहिजे.जोपर्यंत बाबासाहेबांच्या धम्मदीक्षांचे सोहळे आपण घेणार नाही तोपर्यंत आपली भागीदारी वाढणार नाही, म्हणून बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी जागोजागी धम्मदीक्षा सोहळा घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन बुद्धगया ( बिहार) चे भदंत हर्षबोधी महास्थवीर यांनी केले.ते ब्रह्मपुरी येथील पंचशील एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात अध्यक्षपदावरून बोलत होते.

    धम्ममंचावर प्रमुख वक्ते म्हणून नाशिकचे बौध्द साहित्यिक आचार्य नंदकिशोर साळवे,विशेष अतिथी श्रीलंकेचे भदंत धम्मप्रिय, दिल्लीचे भदंत डॉ.दीपंकर सुमेदो उपस्थित होते. याशिवाय समितीचे अध्यक्ष अशोक रामटेके,उपाध्यक्ष सुधिर अलोने,सचिव डॉ युवराज मेश्राम,संघटक नेताजी मेश्राम यांचीही उपस्थिती होती.याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते दहावी व बारावीमधिल गुणवंतांचा गौरव करण्यात आला.

      यावेळी डॉ भदंत दीपंकर सुमेदो म्हणाले की, बाबासाहेबाने धम्मदीक्षा देऊन आपल्याला पूर्वीच्या धम्मात नेले.बाबासाहेबाचा रस्ता बुध्द धम्मापासून सुरु होतो.एका आंबेडकरीचा अर्थ होतो शिक्षित,समजदार व्यक्ती जो ज्ञान पसरवितो, असे मत व्यक्त केले तर आचार्य नंदकिशोर साळवेंनी,धम्मचक्र प्रवर्तन दिन हा दिवस आपल्या समाजाच्या प्रगतीचे हमीपत्र आहे.आपण धम्माबाबतीत उदासीन का आहोत? बाबासाहेबांच्या विचाराचे पालन करा व चळवळ पुढे न्या !,असे आवाहन केले.

    कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेला माल्यार्पण करुन त्रिशरणाने झाली. प्रास्ताविकेतून समितीध्यक्ष अशोक रामटेकेंनी समितीचे कार्य व आपली भूमिका स्पष्ट केली.संचालन समिती सचिव डॉ युवराज मेश्राम तर आभार आसाराम बोदेलेनी मानले. यशस्वीतेसाठी समिती पदाधिकारी सुधाकर पोपटे,के.जी, खोब्रागडे,राजू मेश्राम,दिनेश लोखंडे, जगदिश मेश्राम,इंजि.विजय मेश्राम,डॉ चंद्रशेखर बांबोळे, डॉ ई.एल.रामटेके,नरेंद्र बांते, अंकुश वाघमारे,महेंद्र कसारे,भीमानंद मेश्राम इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये