इंग्रजी भाषा क्लबची स्थापना व विविध कृतीयुक्त उपक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
श्री जगन्नाथ बाबा विद्यालय वायगाव येथे इंग्रजी भाषा क्लबची स्थापना करण्यात आली. या क्लबचे उद्घाटन शाळेचे श्री एन. एस. धानोरकर सर,मुख्याध्यापक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
या प्रसंगी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे महत्त्व पटवून सांगितले व क्लबमार्फत होणाऱ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. उद्घाटनानंतर क्लब सदस्यांनी इंग्रजी ग्रामर चे खेळ ,इंग्रजी संवाद, इंग्रजी प्रश्नमंजुषा व इंग्रजी टॉपिक वर बोलणे असे उपक्रम व स्पर्धा, संवाद सत्र अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबद्दलची आवड निर्माण होऊन त्यांच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
या क्लब मध्ये क्लब लीडर म्हणून सावरी आगलावे, क्लब सदस्य म्हणून आरती घोडमारे, इतर सदस्यांमध्ये नैतिक माकोडे, प्रेम धोंगडे, पूर्वी भोयर ,शुभांगी नन्नावरे, श्रेया गायकवाड, नंदिनी मगरे ,राखी नन्नावरे ,मंथन कुरेकर, श्रवण डाखोरे तर क्लब मेंटॉर मंगेश बोढाले यांचा सहभाग आहे.