देवीच्या मूर्तीची विटंबना करणारा आरोपी वर्धा पोलीसांच्या ताब्यात
भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये याकरिता वर्धा जिल्हात वर्धा पोलिस तैनात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक रोजी फिर्यादी नामे देव कुमार शेषराव गायकवाड वय 45 वर्षे राहणार स्टेशन फैल वर्धा याने पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे येऊन लेखी रिपोर्ट दिली की आरोपी नामे शोएब खाॅ मुख्तार खाॅ पठाण वय 26 वर्षे राहणार सिध्दार्थ नगर बोरगाव मेघे तहसील जिल्हा वर्धा याने जय माता दि दुर्गा उत्सव मंडळ स्टेशन फैल वर्धा येथे मंडपामध्ये गरबा दांडिया महिला खेळत असताना आरोपी दारू पिऊन गाडी चालवत मंडपात प्रवेश केला तेव्हा मंडळातील सदस्यांनी त्याला सांगितले की तुझी गाडी दुसरीकडे घेऊन जा म्हटले असता आरोपीने अश्लील भाषेत शिवीगाळ करून तुम देवी कैसे उठाते हो तुम को खून से लतपत कर दुंगा अशी धमकी दिली असे फिर्यादीच्या रिपोर्ट वरुन पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते. परंतु दिनांक 3 आक्टोबंर 2025 रोजी देवीचे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली असताना पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे देवीची मिरवणूक थांबवून मंडळातील सदस्यांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या असे आग्रह केला तेव्हा वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अनुराग जैन वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांनी सांगितले की आरोपीला ताब्यात घेतले असून आरोपींवर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे तर तुम्ही मंडळी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन केले असताना मंडळींच्या सदस्यांनी पोलिस प्रशासनाचे सांगितले प्रमाणे प्रामुख्याने समजून घेतले व देवीची मूर्ती विसर्जनासाठी घेऊन निघून गेले आरोपी वर अपराध क्रमांक 1460/25 कलम 296(2) 351(2) 352 ,302 ,196 BNS R/W 85(1) म.दा.का. दाखल करण्यात आला आहे ही कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अनुराग जैन वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन वर्धा शहर येथील ठाणेदार संतोष ताले पोलिस स्टेशन रामनगर येथील ठाणेदार अजय भुसारी पोलिस स्टेशन सावंगी मेघे चे ठाणेदार पंकज वागोडे पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील पोलिस निरीक्षक अनिल पाटील वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन चौधरी व पोलिस स्टेशन वर्धा शहर येथील पोलिस प्रशासन रामनगर पोलिस स्टेशनचे पोलीस प्रशासन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस प्रशासन सावंगी मेघे पोलिस स्टेशन चे पोलिस प्रशासन आणि वाहतूक शाखेचे पोलिस प्रशासन यावेळी बजाज चौकात उपस्थित होते…..