ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ट्रॅक्टर, ट्रॉली व रेतीसह एकुण 8 लाख 9 हजाराचा मुद्देमाल जप्त

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धाचे पथकाची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         दिनांक 02/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथक पो.स्टे. हिंगणघाट हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, एक लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर कडाजना शिवारातील नाल्याचे पात्रातून रेती (गौण खनिज) ची चोरी हिंगणघाट कडे येत आहे अशा मिळालेल्या मुखबीरचे खबरेवरून यातील रेती (गौण खनिज) ची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर सापळा रचून कार्यवाही केली असता, नमुद विधीसंघर्षित बालक हा मौक्कावर रंगेहाथ विना परवाना रेती (गौण खनिज) ची महिंद्रा सरपंच 575 DI कंपनीचा लाल रंगाचा विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर व MH 32 AS 2999 क्रमांकाच्या ट्रालीने चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने, त्यास ट्रॅक्टर व रेती (गौण खनिज) बाबत विचारपुस केली असता, विधीसंघर्षित बालक याने सांगितले की, सदरचा ट्रॅक्टर हा आरोपी क्रमांक 02 सागर तिमांडे याचे मालकीचा असून आरोपी क्रमांक 02 सागर तिमांडे याचे सांगण्यावरून कडाजना शेत शिवारातील नाल्याचे पात्रातुन रेती (गौण खनिज) चोरून आणल्याचे सांगितले. तरी सदर विधी संघर्षित बालक व आरोपी संगणमताने त्यांचे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या मौजा कडाजना शेत शिवारातील नाल्याचे पात्रातुन रेती (गौण खनिज) ची चोरी करून, वाहतुक केल्याचे निष्पन्न झाल्याने, पंचासमक्ष मौकाजप्ती पंचनामा प्रमाणे कार्यवाही करून, विधीसंघर्षित बालक याचे ताब्यातुन वरील नमुद वर्णनाचा जु.किं. 8,09,000 रू चा मुद्देमाल जप्त करून, विधीसंघर्षित बालक व आरोपी क्रमांक 02 याचे विरूध्द पो.स्टे. हिंगणघाट येथे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.

           सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. सदाशिव वाघमारे सा., स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा यांचे निर्देशाप्रमाणे स.फौ. मनोज धात्रक, पो.हवा. महादेव सानप, पवन पन्नासे, विनोद कापसे, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.*

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये