ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यस्तरीय बुडो मार्शल स्पर्धेमध्ये चंद्रपूर जिल्ह्याला ५ सुवर्ण पदक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :- पुणे येथे नुकतीच आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धा या स्पर्धेतील महाराष्ट्र राज्यातून १००० विद्यार्थ्यांचा मोठ्या उत्साहाने सहभाग होता. सदर स्पर्धेचे उद्घाटक म्हणून बुडो मार्शल आर्ट चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. परिकर दास तसेच महाराष्ट्र बुडो मार्शल आर्ट चे महाराष्ट्र अध्यक्ष शिहान लहू पारवे सर तसेच जागतिक बुडो मार्शल आर्ट संघटनेचे सदस्य हंशी सौरभ सर तसेच बुडी मार्शल आर्ट असोसिएशन चे महाराष्ट्र तांत्रिक सल्लागार शिहान सचीन पटेकर, विदर्भअम्युचर कराटे असोसिएशन चे व चंद्रपूर जिल्हा बुडो मार्शल आर्ट चे मार्गदर्शक शिहान सोमेश्वर पेलचलवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

वरील स्पर्धा एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथील दि.२८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील उपस्थित मान्यवरांचे स्पर्धेमध्ये सहभाग दर्शविणारे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातून वरील स्पर्धेमध्ये ब्रम्हपुरी चंद्रपूर व सावली तालुक्यातून विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवून पाच सुवर्ण पदक व एक रजत पदक प्राप्त करून आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे नाव राज्य स्तरावर पोहचविले. तेव्हा चंद्रपूर जिल्हा बुडो मार्शल आर्ट चे अध्यक्ष सेन्साई ज्योती मानुसमारे स्पर्धेतील विजयी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थ्यांचे मुख्य प्रशिक्षक सेंसाई सुवोध आलेवार यांचे प्रशिक्षण लाभले. वरील स्पर्धेतील यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावे पुढीलप्रमाणे १. स्नेहा कुत्तरमारे सुवर्ण पदक ५० कि. वजन गट २. सक्षम वासनिक सुवर्ण पदक ४५कि. ३. खुशी पारधी राजत पदक ५० कि 4. श्रुती गावंडे सुवर्ण पदक ५५कि, ५. सिमरन उंदिरवाडे सुवर्ण पदक ४५ कि ६. जानवी वाईलवार सुवर्ण पदक ४० कि. वरील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वजन गटानुसार झालेल्या स्पर्धेमध्ये सुवर्ण व रजत पदक प्राप्त करून आपल्या जिल्ह्याचे व विद्यालयाचे तसेच शिक्षकांचे आई वडिलाचे नाव राज्य स्तरावर पोहचविले. तेव्हा आपल्या यशाचे श्रेय मुख्य प्रशिक्षक सुबोध आलेवार यांना देतात.

वरील विस्तृत माहिती बुडो मार्शल आर्ट संघटनेचे सहसचिव व मुख्य प्रशिक्षक यांच्या द्वारे देण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये