दारू विक्रीला विरोध करणाऱ्याचा खून करणाऱ्या सहा आरोपींना 10 वर्षाचा सश्रम कारावास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीतील येसंबा गावातील दारू विक्रेता बादल उर्फ विजय सुनील पाटील याचे दारू विक्रीला गावातील वसंतराव शिवदास थूल याने विरोध केला होता. त्यामुळे बादल पाटील याने त्याला चाकूने पोटावर वार करून व त्याचे नातेवाईक आकाश पाटील, स्वप्निल दुपट्टे, राजू दुपट्टे, मंजुषा पाटील, कैलास जुनघरे सर्व राहणार येसंबा यांनी लाठ्या काट्यांनी मारहाण करून दिनांक 03/08/19 रोजी खून केला होता. सदर प्रकरण अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री अली सत्र न्यायालय वर्धा यांनी आज सर्व आरोपींना 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आज दिनांक 29/09/25 रोजी सुनावली.
गुन्ह्याबद्दल थोडक्यात माहिती 1. अपराध क्रमांक 385/2019 कलम 302, 143, 148, 149 ipc 2.
फिर्यादी _ प्रतीक वसंतराव थूल रा. येसंबा तालुका जिल्हा वर्धा (मृतक चा मुलगा) 3. मृतक _ वसंतराव शिवदास थूल वय 59 वर्ष राहणार येसंबा तालुका जिल्हा वर्धा 4. शिक्षा झालेले आरोपी _ 1)बादल उर्फ विजय सुनील पाटील वय 24 वर्ष 2) आकाश सुनील पाटील वय 23 वर्ष 3) स्वप्निल उर्फ सोनू राजू दुपट्टे वय 21 वर्ष 4) राजू झुडकू दुपट्टे वय 45 वर्ष 5) कैलास संतोष जुनघरे वय 55 वर्ष 6) मंजुषा बादल पाटील वय 22 वर्षे सर्व राहणार येसंबा तालुका जिल्हा वर्धा. 5. गुन्हा घडला तारीख दिनांक 03/08/19 (6.) गुन्हा घडला ठिकाण _ येसंबा (7). तपास अधिकारी _ PI संजय बोठे
(8.) गुन्ह्याची हकीकत _ यातील आरोपी क्रमांक 01 अवैधरित्या दारू विक्रीचे काम करत होता. यातील मृतकने गावात दारू विकू नको असे असे आरोपी क्रमांक 01 यास म्हटले त्या कारणावरून यातील आरोपी क्रमांक 01 याने मृतकचे पोटात चाकूने मारहाण करून आणि इतर आरोपींनी लाठ्या काठ्यांनी व बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारले.
8. आरोपींना झालेली शिक्षा _
कलम 304(2) भा द वि मध्ये प्रत्येकी 10 वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 5000 रुपये दंड
कलम 143 भादवी मध्ये प्रत्येकी 06 महिने सश्रम कारावास व प्रत्येकी 2000 रुपये दंड
कलम 148 भा द वि मध्ये 06 वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी 2000 दंड
9. तपाशी अधिकारी _ श्री बोठे
10. कोर्ट _ श्री अली अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्धा
11. सरकारी वकील _ श्री ठाकरे
12. कोर्ट पैरवी _ पोलीस हवालदार जितू डांगे पोलीस स्टेशन सेवाग्राम