ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवरात्रोत्सवाचा जल्लोष, देवी विसर्जनासाठी वर्धेत वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : शहरात नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून देवी भक्तांच्या गर्दीने वर्धा दुमदुमली आहे. प्रत्येक चौकाचौकात देवी मंडप, लंगर, महाप्रसादाचे आयोजन सुरू असताना शेजारील गावांतील नागरिकही दर्शनासाठी वर्धेला धाव घेत आहेत. यामुळे वाढलेल्या गर्दी व वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशान्वये वाहतूक पोलिसांनी शहरात काटेकोर नियोजन करून चोख बंदोबस्त उभारला आहे.

संध्याकाळी ४ ते रात्री १२ या वेळेत शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यासाठी जुनापानी नाका, धूनीवाले बाबा मठ, उडानपुल व आरती चौक येथे पॉइंट ड्युटीवर अधिकारी-अमलदार तैनात करण्यात आले आहेत.

१ ऑक्टोबर रोजी देवी विसर्जन होणार असून त्या दिवशी दुपारी ४ ते रात्री १२ या वेळेत शहरात अवजड वाहनांची व लहान वाहनांची मिरवणूक मार्गावर प्रवेशबंदी असेल. त्यासाठी बजाज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बॅरिकेड्स उभारण्यात येणार आहेत. या मार्गा ऐवजी पर्यायी मार्ग बजाज चौक ते पोस्ट ऑफिस मार्गे जेल रोड आदित्य मेडिकल असा सुरू राहणार आहे.

मिरवणूक मार्ग बजाज चौक, निर्मल बेकरी चौक, सोशलिस्ट चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आरती चौक मार्गे पवनार विसर्जन स्थळ असेल. या मार्गावर गर्दी, लंगर व महाप्रसादाचे आयोजन असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

**पर्यायी मार्ग**

बजाज चौक.एस टी बसस्टॅन्ड, पोस्ट ऑफिस चौक आरती चौक व बाहेरील पर्यायी मार्ग चा मिरवणूक दिवशी वापर करावे,

नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून उत्सव शांततेत व सुरळीत पार पाडावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे निरीक्षक विलास पाटील यांनी केले आहे.

*नागरिकांसाठी सूचना*

विसर्जन मार्गावर मोठी व अवजड वाहने आणू नयेत, लहान मुले व ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी, गर्दीत दागदागिने, पर्स, मोबाईल वापरणे टाळावे, अडचण आल्यास टोल फ्री क्रमांक ११२ वर संपर्क साधावा,

             पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये