स्वस्थ नारी, सशक्त परिवार अंतर्गत रोगनिदान शिबीर संपन्न
सावलीचे ग्रामिण रुग्णालयचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर पर्यंत सेवा पंधरवाडा अभियांनाअंतर्गत सावलीचे ग्रामिण रुग्णालयात (दि. 29) रोजी स्वस्थ नारी, सशक्त परिवार अंतर्गत रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा मौखीक अधिकारी डॉ. पिपरे, उद्घाटक म्हणुन सावलीचे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष साधना वाढई तर प्रमुख पाहुणे म्हणुन सावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चौधरी, नायब तहसिलदार मडावी, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमचंद कन्नाके, डॉ. नेत्तुलवार, डॉ. बिस्वास, डॉ. निशा आदि मान्यवर उपस्थित होते. या शिबीराकरीता चंद्रपूरचे तज्ञ डॉक्टरांनी आरोग्य तपासणी केली. या शिबीराला रुग्णाचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
या शिबीराचा मुख्य उद्देश महिलांच्या सर्वांगीण आरोग्य संवर्धनासोबतच पोषण आणि निरोगी जीवनशैलीबाबत व्यापक जनजागृती करणे हा आहे. या शिबीरात रक्तदाब, मधुमेह, क्षयरोग, स्त्रीरोग यासारख्या आजाराचे निदान करण्यात आले तर प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक क्षयरोगाचा रुग्ण दत्तक घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. महिलांसाठी माता व बालसुरक्षा कार्ड, आयुष्यमान भारत योजनेचा लाभ, पोषणपूरक आहार याबाबत मार्गदर्शन करण्यता आले.
या शिबीरासोबतच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान हेच जीवनदान या मध्ये सामील होत रक्तदान केले. कार्यक्रमाचे संचालन बाकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. कन्नाके यांनी केले.