सावली ते हरांबा रस्त्यासाठी विद्यार्थीच रस्त्यावर
सावलीचे बांधकाम विभागावर विद्यार्थ्यांचा मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली ते हरांबा या रस्त्यावरुन क्षमता नसलेले रेतीचे वाहने गेल्याने रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले असुन यामुळे मोठा अपघात होवून जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याने हरांबा, लोंढोली, साखरी, सिरसी, जिबगाव, उसेगाव, घोडेवाही, सिंदोळा येथील विद्यार्थी शिक्षणासाठी सावली येथे येतात. परंतु सदर रस्ताच जिवघेणा ठरत असल्याने या रस्त्यावरुन ये-जा करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी या मागणी करीता (दि. 29) रोजी अखेर विद्यार्थ्यांचाच मोर्चा सावलीचे बांधकाम विभागावर धडकला.
रस्त्याची दयनिय अवस्था पाहता या मार्गाने महामंडळाच्या बसेस सुध्दा कमी अधिक प्रमाणात येत आहेत. तर या रस्त्याने मंद गतीने वाहने चालीत असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहचणे शक्य नसल्याने मोठया प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. तर पुढील आठवडयात शालेय प्रथम सत्रांत परीक्षा असल्याने परीक्षेला वेळेवर कसे जावे हा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकात निर्माण झालेला असुन विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील महिण्यामध्ये या मार्गावर रेतीचे वाहने चालत असल्याने या रस्यााधला खडयाचे स्वरुप आलेले आहे. मात्र या गंभीर बाबीकडे संबधीत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सावली ते हरांबा मार्गाचा संपर्क तुटला असुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आलेले आहे. त्यामुळे रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर केले. या बाबीकडे दुर्लक्ष झाल्यास मुख्य मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी विद्यार्थ्यांनी दिला. मात्र क्षमता नसलेल्या रस्यााववरुन जड वाहनाची वाहतुक करण्याची परवानगी का देण्यात आली? हा प्रश्न निरुत्तरीतच आहे.
रस्ता खराब असल्याने आम्हाला वेळेवर शाळेत हजर राहता येत नसल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी आमच्या मागणीची वेळीच दखल घेवून रस्ता दुरुस्त करण्यात यावा.
प्रदिप आभारे उसेगाव विद्यार्थी
सदर रस्तावरचे काम मंजुर असुन निधी अभावी कंत्राटदार काम करण्यास तयार नाही, या रस्यानीची काही कामे झालेली होती पण रेतीच्या जड वाहतुकीमुळे रस्या्मची दुरावस्था झालेली आहे. सध्या या रस्त्यावरची डागडुजीचे काम सुरु असुन रस्याडवचे काम सुरु करण्याकरीता वरीष्ठांकडे पाठपुरावा केलेला आहे.
सुधीर राऊत, शाखा अभियंता बांधकाम उपविभाग सावली