ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरीता फसगत करणाऱ्या नागपूर कराराची होळी

चंद्रपूर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जीवती येथे विराआंसचे आंदोलन 

चांदा ब्लास्ट

सन२०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ मिळविणारच – ॲड. वामनराव चटप 

चंद्रपूर :_

       नागपूर करारा द्वारे दिनांक २८ सप्टेंबर १९५३ रोजी विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट झाला. मात्र या ७२ वर्षात या कराराद्वारे देण्यात आलेली आश्वासने पाळली नाही. यामुळे विदर्भात अनेक ज्वलंत समस्या निर्माण झाल्या. याचा निषेध करण्यासाठी आणि आता स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, या मागणीसाठी चंद्रपूर शहरातील जेटपूरा गेट येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर विदर्भवादी कार्यकर्त्यांनी ॲड.वामनराव चटप यांच्या नेतृत्वात दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता विदर्भ कराराची होळी करून आणि जोरदार घोषणा देऊन आपला संताप व्यक्त करीत निषेध केला आणि सन २०२७ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविणारच असा निर्धार व्यक्त केला.

चंद्रपूर :_

                चंद्रपूर येथील या आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड.वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष किशोर दहेकर, मुन्ना खोब्रागडे, किशोर सहारे, तबस्सुम शेख, पुंडलिक गाठे, अंकुश वाघमारे, मितीन भागवत, रमेश पावडे, शेषराव बोंडे, दिलीप देठे, अरूण सातपूते, पांडूरंग पोटे, सुधीर सातपूते, आनंद चिकनवर, मारोती येरणे, साईनाथ पिंपळशेंडे, समाधान लडके, शंकर थेरे, सुनिल गौरकार यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले.

राजुरा :_

     राजुरा येथे संविधान चौकात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केल्यानंतर जोरदार घोषणा देत नागपूर कराराची होळी करण्यात आली. येथे आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंंदोलन समितीचे ॲड. अरूण धोटे,माजी नगराध्यक्ष रमेश नळे, बंडू देठे, भाऊजी कन्नाके, नरेंद्र काकडे, मसूद अहमद, राजू धोटे, दिलीप देरकर, आशुतोष चटप, बंडू झुंगरे, मधुकर चिंचोलकर, नरेंद्र माहेरी, सौरभ मादसवार यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी केले.

कोरपना :_

          कोरपना येथे मुख्य चौकात ” विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा ” अशा घोषणा देत नागपूर कराराची होळी करण्यात आली. या आंदोलनात स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष निळकंठराव कोरांगे, रमाकांत पाटील मालेकर सुनील बावणे, सुभाष तुराणकर, अविनाश मुसळे, सुरेश राजूरकर, सुरेश मालेकर, विजय धानोरकर, विलास आगलावे, उत्तम गेडाम, उमेश कोल्हे, गजानन बेरड, सुनील आमने, अविनाश आगलावे, विलास देवाडकर, रमेश हरबडे, विनायक हुलके, अनिल चटप, रत्नाकर चटप, स्वप्निल झुरमुरे, प्रमोद उराडे, गजानन पत्रीवार, प्रवीण टोंगे, अंकुश काळे, प्रकाश भोयर, काशिनाथ पाचभाई, गणपत काळे, सचिन मोहितकर, अरुण काळे इत्यादीसह अनेक नागरिक सहभागी झाले.

गोंडपिपरी :_

            गोंडपिपरी येथील गांधी चौकात म.गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण करून आंदोलनाला सुरूवात झाली. नागपूर करार जाळतांना स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे, या घोषणांनी परिसर दणाणून गेला. येथील आंदोलनाचे नेतृत्व विराआंस चे नेते शालिकराम माऊलीकर, रामकृष्ण सांगडे, शंकर पाल, प्रफुल आस्वले, अशोक भस्की, आनंद खर्डीवार, साईनाथ फुलमारे, रवींद्र हेपट, गणेश पिंपळशेंडे, कमलाकर खोब्रागडे, मोरेश्वर दुर्गे, कमलेश निमगडे, तावडे सर, सुरज भस्की, दर्शना दुर्गे, उराडे सर, खोब्रागडे सर यांनी केले.

जिवती :

           जिवती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटना च्या वतीने नागपूर कराराची होळी करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष शब्बीर जागीरदार, तालुकाध्यक्ष सुदाम राठोड, गणेश कदम, दत्ता राठोड, विनोद पवार, बंटी ब्राह्मणे यांचेसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

              नागपूर करार होऊन ७२ वर्ष उलटून गेल्यानंतरही या करारातील एकही मुद्दा लागू झाला नसल्याने आमची फसगत झाली आहे. म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात या फसव्या नागपूर कराराची होळी आम्ही केली आहे. नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असणा-या विदर्भात शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बेरोजगारी, सिंचन अनुशेष, सोशिओ एकाॅनाॅमिक प्रश्न असलेला नक्षलवाद, प्रदूषण, बालमृत्यू, कमी झालेले लोकप्रतिनिधी, रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात झालेले स्थलांतर यासारखे अनेक ज्वलंत प्रश्न निर्माण झाले. राज्य प्रचंड कर्जामुळे दिवाळखोरीत निघाले असून आता विदर्भाला न्याय मिळणे अशक्यप्राय बाब आहे. राज्याच्या गंभीर आर्थिक स्थितीमुळे आता विदर्भाचे स्वतंत्र राज्य हाच आमच्यापुढे एकमेव पर्याय असून सन २०२७ पूर्वी आम्ही वेगळे विदर्भ राज्य मिळविणारच आहोत.

                  – ॲड. वामनराव चटप

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये