Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

ज्येष्ठ समाजसेवक स्व.हरिभाऊ मोरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ कारगाव येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

प्राथमिक उपकेंद्र नगराला अंतर्गत येणाऱ्या कारगाव या अतिदुर्गम गावामध्ये अर्थ फाउंडेशनचे संस्थापक स्वर्गीय हरिभाऊ मोरे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त अर्थ फॉउंडेशन गडचांदूर, प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती व टाटा कॅन्सर केअर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर पार पडले. यामध्ये रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, कर्करोग तपासणी – मुखाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग व इतर सर्व आजाराची तपासणी झाली मोफत औषधोपचार देण्यात आला.

गावातील नागरिकांना किटकजन्य आजार व इतर आजाराबाबत माहिती दिली व प्रतिबंधक उपायोजनाबद्दल जनजागृती करण्यात आली. उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय कुळमेथे सरपंच धनकदेवी, प्रमुख अतिथी आयोजक डॉ. कुलभूषण मोरे संचालक अर्थ फॉउंडेशन , डॉ अशिष बारबदे (टाटा ट्रस्ट), सुरज साळुंके, डॉ. ढेंगळे दंतरोग तज्ञ, डॉ विशाल पवार (MO), डॉ डुडुळे (MO) जिवती, रामा चव्हाण, श्रीमती माधुरी अरकरे, आशा सेविका, आशा पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, गावातील प्रतिष्ठित नागरिक व धर्मा कोडापे आरोग्यदूत अर्थ फाउंडेशन साईनाथ मोरे उपस्थित होते.

     शिबिरामध्ये शेकडो रुग्णाची मोफत तपासणी करून औषधउपचार व संदर्भ सेवा दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये