ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भवाद्यांकडून नागपूर कराराची होळी!

विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटनेच्या वतीने नागपूर कराराची होळी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटनेच्या वतीने वतीने रविवार, २८ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिवती येथे नागपूर कराराची होळी करण्यात आली आहे. याच दिवशी ७२ वर्षापूर्वी २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार होऊन अकरा मुद्यांचे आधारावर विदर्भ महाराष्ट्रात सामिल झाला होता. मात्र त्या करारातील अटी व शर्तीचे पालन सरकारने केले नाही. त्यामुळे मुबलक पाणी, सुपिक जमीन, खनिजे, वनसंपदा असा सर्वसंपन्न असलेला विदर्भ प्रदेश विकासाचे बाबतीत मागे तर राहिलाच उलट शेतकरी आत्महत्या, प्रदुषण, कुपोषण, बेरोजगारी, गरीबी, नक्षलवाद, निधीचा प्रचंड अनुशेष यामुळे महाराष्ट्रात गेल्यावर विदभार्चा प्रचंड बट्ट्याबोळ झाला. त्यामुळे हा नागपूर करार ज्या दिवशी झाला, त्या दिवशी विदर्भराज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त करून या नागपूर कराराची होळी करण्याचे आंदोलन केले आहे.

यावेळी उपास्थित सुदाम राठोड तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना, सय्यद शब्बीर जागीरदार जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी संघटना गणेश कदम,युवा आघाडी तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, विनोद पवार, बंटी ब्राह्मणे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये