ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थान यावली शहीदला भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी व जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्यातील यावली शहीद येथे नुकतीच भेट दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मस्थान स्मृतिमंदिराचे यावली येथील सचिव श्री सुनीलराव देशमुख व विश्वस्थ जयकृष्ण धर्माडे यांनी याप्रसंगी गडचांदुर येथील महात्मा गांधी कनिष्ट महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी जिल्हा समन्वयक प्रा. विजय आकनुरवार यांचा या जन्मभूमी भेटी दरम्यान त्यांचा सत्कार केला व या प्रसंगी जन्मस्थान स्मृतीमंदिराची पाहणी करण्यात आली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्या बद्दल या वेळी माहिती जाणून घेतली यावेळी डॉ यश आकनुरवार, संजय मांडवकर,सौ नयना आकनुरवार व यावली येथील जन्मस्थान स्मृतिमंदिराचे सेवाभावी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजींची जन्मभूमी स्वतंत्रपूर्व काळात एका लहानशा खेडे गावात त्यांचा जन्म झाला ते यावली शहीद वासियांचे प्रेरणास्थान होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देश भक्ती भजनाद्वारे ब्रिटिशसत्ते विरोधात भजनातून आवाज उठवला.

श्री संत तुकडोजी महाराज नावाच्या क्रांतिसूर्याच्या रूपाने यावलीच्या क्षितिजावर अवतीर्ण झाले. हेच राष्ट्रसंतांचे जन्म ठिकाण. राष्ट्रसंतांनी आपल्या जीवन प्रवासातून गाव, देश, धर्म, पंथ, संप्रदाय व विश्वबंधुत्व यांना जोडण्याचा अविरत प्रयत्न केला. या प्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मनोभावे पूजा केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये