ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रसंतांच्या साहित्यावर निबंध स्पर्धेचे आयोजन

विकास विद्यालयाचा उपक्रम ; निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

लोक सेवा मंडळ विहिरगाव द्वारा संचालित विकास विद्यालय तथा विकास कनिष्ठ महाविद्यालय विहीरगाव ता सावली येथे गुरुदेव सेवाश्रम नागपूर द्वारा आयोजित राष्ट्रसंत अभ्यास मंडळ जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत कु.अक्षरा विजय वाढणकर या विद्यार्थ्यांनीला प्रोत्साहन पर बक्षीस मिळाले. बक्षिसाचे स्वरूप पाचशे रुपये रोख, प्रमाणपत्र, पुस्तक, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन प्राचार्या कु.गराटे मॅडम आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींनी गौरव केला. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

या निबंध स्पर्धेत 203 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हे विशेष, यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेचे सहकार्य लाभले. ही निबंध स्पर्धा निशुल्क स्वरूपाची असूनही प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.

नंबर आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पुस्तक दिला जाते. या निबंध स्पर्धेचे आयोजन दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे समन्वयक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर सर आणि आयोजन समिती निबंध स्पर्धा घेत असते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार घराघरात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पोहोचावे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत अन्य स्पर्धेत टिकला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून हे आयोजन केले जाते.

सदर कार्यक्रमात सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते संचालन डॉ. धर्मा गावंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विकास पुरेल्लिवार सर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये