ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगरपंचायत सावली तर्फे स्वच्छता पंधरवाडा

श्रमदान - एक दिवस एक तास एक साथ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

‘स्वच्छता ही सेवा – २०२५’ अभियान दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.

स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MoHUA), भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवड्यादरम्यान स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.त्याच अनुषंगाने नगर पंचायत सावलीचे मुख्याधिकारी संदीप दोडे व नगर पंचायत अध्यक्षा साधनाताई वाढई यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी “श्रमदान एक दिवस एक तास एक साथ” स्वच्छता अभियान सावली शहरातील जुनी नगर पंचायत समोरील परिसर भागात राबविण्यात आले.

या अभियान मध्ये नगराध्यक्ष साधनाताई वाढई,नगरसेवक नितेश रस्से,महिला व बाल कल्याण सभापती व नगरसेविका अंजलीताई देवगडे ,नगरसेविका ज्योतीताई शिंदे ,नगरसेविका सीमा संतोषवार ,स्वच्छता निरीक्षक अभय चेपुरवार,नगर पंचायत कार्यालयीन कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी , स्थानिक नागरिकांनी सहभाग नोंदवून सामूहिक श्रमदान करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये