ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर तलाठी अनिल गहुकर निलंबित

भाजयुमोच्या प्रयत्नांना यश : लाचखोरी करने भोवले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती  तालुक्यातील लाचखोरी प्रकरणात तलाठी अनिल लक्ष्मण गहुकर यांना महसूल प्रशासनाने अखेर निलंबित केले असून, या यशस्वी कारवाईमध्ये भाजयुमोचे प्रदेश सचिव इम्रान खान यांची सक्रिय भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

              भद्रावती तालुक्यातील पिपरी (दे) गावातील तलाठी अनिल गहुकर हे शेतकरी वर्गाकडून लाच घेतल्याच्या गंभीर आरोपात अडकले होते. अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर इम्रान खान यांनी याविरोधात लेखी तक्रार करत महसूल प्रशासनाला कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

या तक्रारीवर सुरू झालेल्या तपासणीत तलाठी गहुकर यांचे काही कर्तव्ये नीट पार पाडले गेले नसल्याचे दफ्तरातील नोंदींवरून उघडकीस आले. त्यांनी एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या काळात आवश्यक चलन न भरणे, दौरा दैनंदिनी अद्ययावत न ठेवणे तसेच साजा घोनाड तहसिल कार्यालयातून हटून वरोरा येथून येणे-जाणे करणे यांसही समस्या असल्याचे आढळले. तालुका प्रशासनाने या सर्व दोषांवरून निष्कर्ष काढत उपविभागीय अधिकारी वरोराच्या शिफारशीवर अनिल गहुकर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या अधीन तातडीने निलंबित करण्याचा आदेश तहसिलदार भद्रावती यांनी जाहीर केला आहे.

निलंबित असताना गहुकर यांचे मुख्यालय मुधोली तहसील कार्यालय असेल व तहसिलदारांच्या संमतीशिवाय ते मुख्यालय सोडू शकणार नाहीत. तसेच निलंबन काळातील निर्वाह भत्ताही तहसिलदारांच्या देखरेखीखाली दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा शेवट म्हणून भाजयुमोचे पदाधिकारी इम्रान खान व श्रीपाद बाकरे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून जोरदार विरोध आंदोलन केले. याचा परिणाम म्हणून अखेर प्रशासनाने कठोर पावले उचलली.

यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणाली आणि लोकसेवकांच्या जबाबदाऱ्या याबाबतीत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. ही कारवाई प्रामाणिक प्रशासनाची ओळख सांगणारी आणि भ्रष्टाचाराचा शेवट असल्याचे म्हटले जात आहै.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये