शहरातील मुख्य रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा,अन्यथा आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपरिषद कार्यालयात निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील मुख्य रस्ता हा बाळासाहेब ठाकरे प्रवेशव्दार ते रेल्वेस्टेशन पर्यंत अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे.
या खराब रस्त्याचा फटका पर्यटकांना बसत असल्याने शहरातील पर्यटन प्रभावित झाले आहे. त्यामुळे या रस्त्याची एका महिण्याच्या आत दुरुस्ती करून तो नागरिकांसाठी व पर्यटकांसाठी योग्य असा ऊपलब्ध करुन द्यावा अन्यथा याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पक्षाचे सरचिटणीस मुनाज शेख यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार यांचे नेतृत्वात नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन सादर करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मुनाज शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार, बिपीन देवगडे,शुभम बगडे, आकीफ खान,जाहिद पठाण, रोहित साखरकर,संजय डोंगरे, राकेश किनेकर,प्रमोद वावरे आदी ऊपस्थीत होते.