मतिमंद पीडितेवर सामूहिक बलात्कार
सावली तालुक्यातील सायमारा येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील पोलीस स्टेशन पाथरी अंतर्गत येत असलेल्या सायमारा येथे मतीमंद मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना (दि.21) घडली. या घटनेत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश असुन तुलाराम तानाजी मडावी व विक्की विनोद कोवे दोघेही सायमारा यांचा समावेश आहे. सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदर महिला ही मतिमंद असुन आरोपींनी तीला आमिष दाखवून गावाच्या बाहेर बोलाविले. ती मतिमंद असल्याने घरी काहीही न सांगता त्यांच्या बोलण्यावरुन गावाच्या बाहेर गेली. यात विधीसंघर्ष दोन बालक व आरोपी यांनी मतिमंद महिलेसोबत सामुहिक बलात्कार केल्याचे फिर्यादीचे तक्रारीवरुन निष्पन्न झाले. यावरुन पाथरी पोलीसांनी आरोपींना अटक करुन अपराध क्र. 96/2025 कलम 64(1), 64(2) (आय), 64 (2) (के), 64(2) (एम), 70 (1), 351(2) भारतीय न्यास संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पाथरीचे स.पो.नि. नितेश डोर्लीकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.