ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

झाडीबोली नाट्यसंमेलन स्पर्धेत राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविघालय सावलीचे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

गोंडवाना विद्यापीठ, पदव्युत्तर मराठी विभाग व झाडीबोली साहीत्य दालन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत झाडीबोली नाट्यसंमेलन दि. १९ सप्टेबर ला पार पडले या नाट्यसंमेलनात एकांकिका स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावलीच्या चमुने तृतीय क्रंमाक प्राप्त केला यामध्ये किशोर पुरुषोत्तम बोरकुटे, शिवाणी विकास भोयर, सुरज पुरुषोत्तम बोरकुटे, गोपिचंद कोंडूजी निकोडे, माणसी केशव मोकासी, समीर सुनील गेडाम, अंकुश दशरथ सोनुले, रोहीत मारोती कोसरे इत्यादी विद्यार्यांनी सहभाग घेतला. तसेच झाडीबोली लोककला स्पर्धा यामध्ये लोकगित या कलाप्रकारात राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविघालय सावली येथील बी.कॉम द्वितीय वर्षाला असणारा केतन पत्रु नवघडे यांनी प्रथम क्रंमाक प्राप्त केला.

या यशाबदल संस्थेचे अध्यक्ष मा. संदिपभाऊ गड्डमवार, सचिव राजाबाळ पा.संगीडवार महाविघालयाचे प्राचार्य, डॉ. ऐ. चंद्रमौली, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.प्रफुल्ल वैराळे, डॉ.रामचंद्र वासेकर यांनी या यशाबदल अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये