सांवगी मेघे पोलीसांकडुन गौण खनीज (रेती) चे अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 22/09/2025 रोजी रात्री 01:35 वा चे सुमारास पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील अंमलदार यांना डायल 112 वर माहिती मिळाली की मौजा कुरझडी शेतशीवारातील कुरझडी नाल्यामधून काळी रेतीचे अवैधरीत्या उत्खनन करून रेती ट्रॅक्टरमध्ये भरीत आहे.
अशा माहितीवरून पंच व पो.स्टाफसह मौजा कुरझडी शेतशीवारातील कुरझडी नाल्याजवळ जावून पाहणी केली असता तेथे अवैधरीत्या रेतीचा उपसा करून रेती ट्रॅक्टरमध्ये भरीत असता दिसून आले, त्यावरून आरोपीचे ताब्यातून 1) एक जॉन डियर कंपनीचा बिना नंबरचा ट्रॅक्टर व ट्रॉली क. एम.एच. 32 ए.एक्स 0522 किं. 7,00,000/रू. 2) एक ब्रास काळी ओलसर रेती किं. 6,000/रू. असा एकुण जु.किं. 7,06,000/रू. चा माल. शासनाचा महसुल चुकवुन रेतीची (गौणखनीज) अवैद्यरित्या बिना पासपरवाना रेतीची चोरी करतांना मिळुन आल्याने आरोपी ट्रॅक्टर चालक/मालक शेख अफरोज शेख अब्दुल रा. सालोड हिरापुर, ता.जि. वर्धा. यांचे विरूध्द पो. स्टे. ला अप.क. 761/2025 कलम कलम 303 (2), बि.एन.एस. सहकलम 48(7) 48(8) महा. जमिन महसूल अधि. 1966, सहकलम 4, 21 खान खनिज अधि. 1957, सहकलम 3(1), 181 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज वाघोडे सा, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे व पोलीस स्टाफ पो.हवा विरेद्र कांबळे, पो.हवा संजय पंचभाई, अनुप गोपनारायण अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव, यांनी केलेली असून गुन्हयाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई हे करीत आहे.