दूषित पाणी, बुजलेल्या नाल्या व रसत्यांच्या समस्या मार्गी लावा : वाघेडा ग्रामस्थांची मागणी
१५ दिवसांच्या आत समस्यांचे निराकरणकरा अन्यथा तीव्र आंदोल : सूरज शाहा यांचा प्रशासनाला अंतिम इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील वाघेड़ा गावात समस्यांचे डोंगर निर्माण झाले असून गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी २०२३ पासून अर्धवट अवस्थेत असुन टाकीचे काम पूर्णपणे बंद आहे. परिणामी गावकऱ्यांना दूषित पाणी पिण्यास भाग पाडले जात असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
यासोबतच नालीचे कोणतेही नियोजन नसल्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी गावातील घरात शिरते तसेच गावातील सांड पाणी रस्त्यावर वाहत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मुळे दुर्गंधी पसरत असुन डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड सारख्या आजारांचा धोका वाढला आहे.
गावात रस्त्यांचा अभाव असल्यामुळे दररोज वाहनचालक, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका व शेतकरी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व गंभीर प्रश्नांबाबत दि. १५ सेप्टेंबर ला शिवसेनेच्या वतीने आशुतोष सपकाळ गटविकास अधिकारी भद्रावती यांना निवेदन देण्यात आले असून १५ दिवसांच्या आत समस्यांचे निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा ठाम इशारा सुराज शाहा यांनी दिला आहे. प्रशासनाने तातडीने पाणी टाकीचे काम पूर्ण करून शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच नाली व रस्त्यांची व्यवस्था करावी, हीच नागरिकांची व शिवसेनेची मागणी आहे.
प्रशासनाने या सर्व बाबीकडे लक्ष देऊन गावातील सर्व समस्या मार्गी लावाव्यात अन्यथा होणाऱ्या आंदोलनाची याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असे दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
हे निवेदन देते वेळी शिवसैनिक सुरज शाहा, युवा शिवसैनिक सुमित हस्तक, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, साहिल कसारे, कदिर खान पठाण, गणेश कचाटे, रीतिक रोडे, गौरव काकडे, प्रदीप काकडे, सतीश कुथे, धीरज बावणे, शामराव काकडे, आनंदराव कुथे, विनोद कुथे, मृणाल कुथे व समस्त गावकरी उपस्थित होते.