पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पथकाची दारुबंदी कायद्यान्वये कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि.22/09/25 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पथकाला माहीती मिळाली की, आरोपी प्रवीण राजाभाऊ तल्हार वय 42 वर्ष राहणार इंदिरा गांधी वार्ड हिंगणघाट हा आजनगाव गावाकडून हिंगणघाट गावा कडे गावठी मा दारूची मोपेड वाहनाने वाहतूक करीत येत आहे अश्या माहीती वरून हिगणघाट पोलीस स्टेशन येथील सहाय्यक फौजदार नरेश बुटे पोलीस हवालदार विनोद बुरीले,प्रविन बोधाने, पोलीस अमलदार राजू निवलकर, अजय राठोड यांनी हिंगणघाट येथील शास्त्री वॉर्ड उडान पुलाजवळ नाकेबंदी करुन आरोपी प्रवीण तलवार राहणार इंदिरा गांधी वार्ड हिंगणघाट याचेवर प्रोरेड केला असता आरोपी चे ताब्यातील हिरो मोपेड गाडी क्रमांक क्रमांक.एम.एच 32 ए .ए. 4756 ने गावठी मोहा दारुची वाहतुक करतांना पंचासमक्ष मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यामधुन गावठी मोह दारू, मोटार सायकल,असा एकुण 55000 रू चा माल अवैधरीत्या मिळुन आल्याने जागीच मोका जप्ती पंचनामा कारवाई करून आरोपी विरूद्ध, पो.स्टे. हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक अनूराग जैन साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायर साहेब, याचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक देवेंद्र ठाकूर साहेब, याचे निर्देशाप्रमाणे सहाय्यक फौजदार नरेश बुटे, पोलीस हवालदार विनोद बुरीले,प्रविन बोधाने, पोलीस अमलदार राजू नवलकर, अजय राठोड यांनी केली.