भद्रावती शहरातील मोकळी जमीन महसूल विभागाला हस्तांतरीत करुन पट्टे द्या
भाजप शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी सर्व बेघर असणाऱ्या नागरिकांना हक्काची घरे मिळावी म्हणून संपूर्ण देशात घरकुल योजना राबविली परंतु अनेक नागरिक या योजने पासून वंचित राहावे लागल्याने ज्यांचे जवळ स्वतःची जमीन नाही परंतु शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांना महाराष्ट्र शासनाने अतिक्रमण धारकांना पट्टे देण्याचा महत्वाकांशी निर्णय घेतला परंतु भद्रावती शहरातील सुमठाणा, डोलारा, गवराळा, विंजासन, पांडव वार्ड, हनुमान नगर, नेताजी वार्ड, शिवाजी नगर येथीलअतिक्रमित जमीन हि सरकार असली तरी 7/12 असलेली झूडपी जंगल जंगल, गायरान, चराई ची नोंद असल्याने शासकीय यंत्रनेला अतिक्रमण धारकांना पट्टे देण्यास अडचण निर्माण झाली आहे.
तरी भद्रावती शहरातील सुमठाणा, डोलारा, गवराळा, विंजासन, पांडव वार्ड, हनुमान नगर, नेताजी वार्ड, शिवाजी नगर येथील 7/12 महसूली रेकार्ड वर असलेली झूडपी जंगल जंगल, गायरान, चराई नोंद कमी करून ती जमीन महसूल विभागाकडे वळती करून अतिक्रमण धारकांना पट्टे देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन मा आमदार करणजी देवतळे यांचे माध्यमातून मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच राज्याचे महसूल मंत्री मा चंद्रशेखर जी बावनकुळे तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविण्यात आले.
निवेदन देते वेळी भाजपचे असीम बिस्वास, समीर गोलदार, गौतम सरकार, मंगेश देवगडे, रॉय व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.