ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या 2 आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार

चांदा ब्लास्ट

घुग्घुस : जिल्ह्यात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व दसऱ्यासारखे मोठे सण उत्साहात साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पो. ठाणे घुग्घुस ता. जि. चंद्रपुर हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 2 आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

माहितीनुसार, उपविभागीय अधिकारी तथा न्याय अधिकारी, यांचे आदेशानुसार दंड प्रक्रिया संहिता कलम 56(अ)(ब) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

 हद्दपार आरोपींमध्ये :

 पहला राहणार – गांधी नगर, घुग्घुस – 6 महिन्यांसाठी जिल्हाबाहेर.,

 दूसरा राहणार विद्या टॉकीज जवड़, घुग्घुस – 3 महिन्यांसाठी जिल्हाबाहेर.

ही कारवाई सुधर्शन मुनमुनका, पोलिस अधीक्षक चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रपुर, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रपुर, घुग्घुस पोलिस निरीक्षक प्रकाश राऊत आणि संबंधित अधिकारी-अंमलदार यांनी केली.

 उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये