धनोजे कुणबी समाज मुलींच्या वसतिगृह जागा मंजुरीचे आश्वासन
ना. बावनकुळे यांची समाज मंडळाचे अध्यक्ष श्रीधर मालेकर यांच्या निवासस्थानी बैठक

चांदा ब्लास्ट
धनोजे कुणबी समाज हा मोठ्या संख्येने असून मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतकऱ्यांच्या मुलींना उच्च शिक्षणाची सोय व्हावी व त्यांना चंद्रपूरसारख्या शहरात राहता यावे म्हणून समाजाने होतकरू मुलींसाठी वसतिगृह निर्माण करावे. त्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेला अवश्य मंजुरी देऊ, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक तुकूमस्थित गोपाळनगर येथील धनोजे कुणबी समाज मंदिराचे अध्यक्ष श्रीधर मालेकर यांच्या निवासस्थानी समाजबांधव बैठकीत व्यक्त केले.
यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे त्वरित सादर करावा, असेही त्यांना सांगितले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, शहर भाजपाध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, माजी आमदार सुधाकर कोहळे व मान्यवर मंडळी उपस्थित होती. समाज मंदिराचे अध्यक्ष श्रीधर मालेकर यांनी समाजाच्या आजपर्यंतच्या कार्यावर प्रकाश टाकून आमदार जोरगेवार यांनी समाजासाठी वाचनालय निर्मिती करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लवकरच जागेबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे कार्यवाही करू असेही मालेकर म्हणाले.
बैठकीला समाज मंडळाचे उपाध्यक्ष संजय ढवस, सचिव अतुल देऊळकर, सहसचिव
नामदेव मोरे, सदस्य रवींद्र झाडे, मंजुषा मोरे, मनिषा बोबडे, इंजि. अरविंद मुसळे, इंजि. प्रभाकर दिवसे, ओबीसी महासंघाचे सचिव सचिन राजुरकर, प्रभाकर पारखी, भाऊराव झाडे, अरुण मालेकर, अरुण देऊळकर, गणपत हिंगाणे, अँड. विलास माथनकर, दिलीप मोरे, विनोद पिंपळशेंडे, रणजित डवरे, पंडित पारोधे, प्रा. सुरेश लोहे, अजय जयस्वाल, संगिता मालेकर, शैला मालेकर, माधुरी मालेकर नेहा लांबाडे, प्राची मालेकर, विनोद मालेकर, डॉ. शिवम सातपुते, रवींद्र टोंगे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन नामदेव मोरे यांनी केले.