ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

माजी मंत्री गड्डमवार स्मृती दिनानिमित्त गुणवंतांचा सत्कार

प्रत्येकानी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपला ध्येय साध्य करावा असे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रा.शेखर प्यारमवार

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री वामनराव गड्डमवार स्मृती दिनानिमित्त सावली तालुक्यातील व मंडळा अंतर्गत गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील पाचही माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या समारंभाचे अध्यक्ष मंडळाचे सचिव राजाबाळ संगिडवार , प्रमुख अतिथी माजी आमदार देवराव भांडेकर तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून सावलीचे गट विकास अधिकारी मधुकर वासनिक व पोलिस निरीक्षक आशिष बोरकर उपस्थित होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संदीपभाऊ गड्डमवार, उपाध्यक्ष अनिल स्वामी,डॉ.विजय शेंडे, अंकेक्षक सुनिल बल्लमवार,संजय शृंगारपवार,अजय गड्डमवार,सदस्य सुनिल नरेड्डीवार, डॉ.चंद्रमौली,रवल गड्डमवार,रितेश जीडगलवार,वर्षाताई वडेटवार तसेच नंदाताई अल्लुरवार,वसंत अल्लूरवार डॉ.अशोक खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणातून गड्डमवार साहेबांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करतांना आहे त्या परिस्थितीत आपल्या स्वप्नांना पूर्ण करता येते हे स्वतःच्या उदाहरणाने पटवून दिले. प्रत्येकानी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपला ध्येय साध्य करावा असे आवाहन केले.


या अगोदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अंकेक्षक सुनिल बल्लमवार यांनी करतांना गुणवंतांना योग्य मार्ग निवडता यावा यासाठी स्मृतिदिनाला हा कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. असे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुपले यांनी तर आभार राजू केदार यांनी मानले. कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व सर्व शिक्षक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये